चंद्रपूर शहर महानगरपालिका मनमा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था , चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) करीता एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने वैद्यकिय अधिकारी , फार्मासिस्ट व एएनएम पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याकरीता दिनांक १७/०१/२०२२ रोजीची जाहिरात दिनांक १८/०१/२०२२ रोजी दै . नवभारत वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती.
दिनांक २९ /०१ / २०२२ त्या अनुशंगाने राज्यस्तरावरून प्राप्त झालेल्या पत्रातील सुचनेअन्वये , मा . उपसंचालक , आरोग्य सेवा , नागपूर मंडळ नागपूर व जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था , चंद्रपुर यांचेमार्फत एएनएमच्या २३ रिक्त पदावर समायोजन करावयाचे असल्याने रिक्त असलेल्या एएनएम पदांची पदभरती स्वगीत करण्यात येत आहे. वैद्यकिय अधिकारी व फार्मासिस्ट पदांकरीताची पदभरती प्रक्रियेची पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.