Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १९, २०२२

PM Modi यांच्या हस्ते ब्रह्माकुमारीज् तर्फे आयोजित `स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` कार्यक्रमाचे उद्घाटन 20 जानेवारी, रोजी.




स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष:
पंतप्रधानांच्या हस्ते ब्रह्माकुमारीज् तर्फे आयोजित
`स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` कार्यक्रमाचे उद्घाटन 20 जानेवारी, रोजी

सन 2022 हे वर्ष भारत सरकार संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करीत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ब्रह्माकुमारीज् संस्थेने `स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे` या विषयावर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ज्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यंटन मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आणि उपक्रमाांचे आयोजन करण्यात येईल.

ब्रह्माकुमारीज् देशव्यापी कार्यक्रमाचे राष्ट्रीय उद्घाटन गुरुवार 20 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या मुख्यालय, शांतीवन, माउंट आबू येथील विशाल डायमंड सभागारात भारताचे पंत्रप्रधान माननिय श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने होईल. याप्रसंगी पंतप्रधान कार्यक्रमास शुभेच्छा देखील देतील. कार्यक्रमास भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री. जी. किशन रेड्डी आणि अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित असतील. कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् महासचिव बी.के. निर्वेर आणि कार्यकारी सचिव बी.के. मृत्युंजय यांनी केले आहे.

उपरोक्त कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार असून देशभरातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात केले जाऊन त्या-त्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर लाखो साधक पाहतील. याबाबतीत माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ब्रह्माकुमारीज् संयुक्त मुख्य प्रशासिका ब्रह्माकुमारी संतोषदीदीजींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित होतील.

ऑनलाईन लिंक: http://bkinfo.in/amritmahotsav





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.