Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात 19 टक्के आरक्षणाने ओबीसींची नोकर भरती करण्याचा मार्ग मोकळा #obc

ओबीसी आरक्षणाची बिंदुनामावली जाहीर
चंद्रपूर जिल्ह्यात 19 टक्के आरक्षणाने ओबीसींची नोकर भरती करण्याचा मार्ग मोकळा

अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गट-क व गट-ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय 15 सप्टेंबर 2021 च्या मंत्रिमंडळात घेण्यात आला व लगेच 23 सप्टेंबर 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला. परंतु सुधारित आरक्षणाची बिंदुनामावली जाहीर करण्यात आली नव्हती त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून चंद्रपुर जिल्ह्यातील सुधारित आरक्षणा प्रमाणे वर्ग 3 व 4 च्या नोकर भरती रखडल्या होत्या. सुधारित बिंदुनामावली लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी म्हणून गेल्या तीन महिन्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे तगादा लावला होता.

या प्रयत्नांना यश आले असून चंद्रपूर जिल्ह्यात 19 टक्के आरक्षणाने ओबीसी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
3 जानेवारी 2022 रोजी सुधारित बिंदुनामावली चा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. सदर बिंदुनामावली, शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे 23 सप्टेंबर 2021 पासून अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी या सुधारित बिंदूनामावली चा अवलंब करण्याची सूचना  सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
     18 जून 1994,  सप्टेंबर 1997 व ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार वरील आठ जिल्ह्यामधील आरक्षण 19 टक्क्यावरून कमी करण्यात आले होते.सदर 8 जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटनांनी यासाठी दीर्घकालीन लढा दिला होता. आज या लढ्याला यश आले असून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे ,समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर ,सुभाष घाटे,कल्पना मानकर ,दिनेश चोखारे, चेतन शिंदे,सूर्यकांत खनके, प्रा अनिल शिंदे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे,बबनराव फंड, बबनराव वानखेडे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा नितीन कुकडे कार्याध्यक्ष प्रा बबनराव राजूरकर, महासचिव विजय मालेकर, देवराव दिवसे, रवींद्र टोंगे,तुळशीदास भुरसे , सुधाकर रोहनकर, राजू हिवंज, गणपती मोरे, बादल बेले, रामदास कामडी ,रजनी मोरे, पौर्णिमा मेहरकुरे,ज्योसना लालसरे, तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार, ना.छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नानाभाऊ  पटोले यांचे व राज्य सरकारचे आभार मानले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.