Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

दाऱ्याघाट पर्यटन क्षेत्र,आंबोली गावच्या सरपंच सौ. नामाबाई अरुण मोहरे यांचा पर्यटनासाठी विशेष सन्मान |

 दाऱ्याघाट पर्यटन क्षेत्र, आंबोली गावच्या सरपंच सौ. नामाबाई अरुण मोहरे यांचा पर्यटनासाठी विशेष सन्मान



जुन्नर /आनंद कांबळे 

आज दिनांक 3 डिसेंबर रोजी  ओझर येथे  यांचा पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन , जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग आयोजित जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळेचे आयोजन ओझर याठिकाणी करण्यात आले होते. 


या कार्यशाळेत जुन्नर तालुक्याचा भौगोलिक व ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासंबंधीची व पर्यटन विकासाची भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली. या कार्यशाळेसाठी विविध पर्यटन संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.


जुन्नर तालुक्याच्या पर्यटनवाढीसाठी सध्या सुरू असलेले प्रकल्प व शासनाचे विविध पातळीवर सुरू असलेले प्रयत्न यासंबंधीची भूमिका मी यावेळी बोलताना मांडली. पर्यटनाच्या विविध संधी व त्यासाठी शासनाच्या मदतीने पर्यटन विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू असे उपस्थित पर्यटनप्रेमींना आश्वस्त केले. जबाबदार पर्यटन हि महत्वाची संकल्पना आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची पर्यटनाविषयीची जबाबदारी निश्चित करणे व आपल्या जबाबदारीची जाणीव दोन्हीही घटकांनी ठेवणे. पर्यटन वाढीसाठी अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जबाबदार पर्यटन हा महत्वाचा मुद्दा आहे. पर्यटनासाठी विशेष कार्य केलेल्या गावांपैकी आंबोली व घाटघर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

     

         आंबोली गावच्या सरपंच यांनी दाऱ्याघाट येथे जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाल्यापासून पहिला उपद्रव शुल्क नाका आंबोली येथे सुरू करून पर्यटकांसाठी आकर्षण आणि धबधबे तसेच डोंगर दर्या पाहण्यासाठी इथे खूप पर्यटक येतात आणि त्याठिकाणी विविध बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी तसेच दाऱ्या घाटाची स्वच्छ्ता राखण्यासाठी सदर टोल वसुली सुरू करून पर्यटकांसाठी आकर्षण आणि धबधबे तसेच गावाला प्रसिद्धी मिळण्यासाठी मा. म्हसे साहेब उपवनसंरक्षक जुन्नर आणि जुन्नर पर्यटनाचे अध्यक्ष मा.यश मस्करे यांच्या प्रेरणेतून समस्थ ग्रामस्थ आंबोली यांनी सुरू केला आणि तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग यांच्या वतीने ग्रामपंचायत आंबोली यांच्या सरपंच सौ. नामाबाई अरुण मोहरे व त्यांचे सर्व सहकारी यांचा सन्मान करण्यात आला. गावांमध्ये केलेल्या विविध विकासकामे यामुळे अगदी दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषद पुणे व जुन्नर पंचायत समिती यांसकडून सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला आहे.


यावेळी आंबोली गावचे उपसरपंच श्री.सखाराम काठे,श्री.शांताराम भालचिम, श्री.संजय दाते, सौ.सविता कोकणे, सौ. शांताबाई भालचिम व सचिव टी. एस आंभिरे तसेच मा. सरपंच गोंविद खुटाण, सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी श्री. शांताराम भालचिम, श्री. बबन मोहरे आणि उच्छिल विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. अरुण लहू मोहरे, श्री बबन नाडेकर आदि नागरिक उपस्थित होते.


या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख साहेब, पर्यटन संचालनालयाच्या समन्वयक करमरकर मॅडम, मा.आमदार व जुन्नर पर्यटनाचे शिल्पकार मा. शरददादा सोनवणे आपला माणूस, जि.प.सदस्य मोहितशेठ ढमाले, पंचायत समिती सभापती विशालभाऊ तांबे, विघ्नहर देवस्थान चे अध्यक्ष गणेश कवडे, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, शिवाजी ट्रेल, जुन्नर तालुका पर्यटन विभागचे अध्यक्ष यश मस्करे,त्यांचे पदाधिकारी, कृषि विभाग, वनविभाग, शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, पर्यटन प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.