आज मुल नगरपरिषदच्या नगराध्याक्षांचा कार्यकाल संपलेला असून ‘भारमूक्त‘ झाले असे म्हणून नागरिकांचे आभार मानत दिला निरोप. 28 नोव्हेंबर 2016 ला थेट निवडणूकीव्दारे निवडून आलेल्या प्रा. रत्नमाला भोयर नगराध्यक्षपदी 31 डिसेंबरला पदभार स्विकारला.
आज निरोप घेतांना त्यांनी सुप्रसिध्द कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सुमित्रानंदन पंत यांच्या ओळी म्हणत. मानले नागरिकांचे आभार.
यह साॅंझ उषा का आॅंगन
आर्लिगन विरह मिलन का
चि-हास अश्रूमय आनन
रे इस मानवजीवन का
वरील ओळींचा उल्लेख करत नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाला मध्ये अनेक विकासाची कामे झालेली असून सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात शाळेची इमारत,रिक्रिऐषन सेंटर,जलतरण तलाव,इनडेाअर मेम, महर्षि पतंजली योगा हाॅल, पैलवान खाशाबा,जाधव व्यायामशाळा दलितमित्र वि.तु.नागपूरे तालुका क्रिडासंकुल सवित्रीबाई फुले अभ्यासिका, तलावाचे सौंदर्यीकरण, चैकातील रमणीय कांरंजे,सुभोभिश पुतळे,विहिरींचे सौदयीकरण,प्रबोधनपर सार्वजनिक भिेतीवरील चित्रे,खुल्या जागेवरील सौंदयीकरणासह संरक्षक भिेतीचे बांधकामग्रीन जीम,सौर उर्जेवरील सिग्गल चैकातील,शुद्ध पाण्याची वितरण व्यवस्थाख्पाण्याच्या टाकीचे बांधकाम इत्यादी कामे झालेली असून,जनतेच्या हिताच्या दृष्टिने घरकुलासाठी जागा हस्तांतरित करणे,महिलांच्यासक्षमीकरणासाठी बचत गट,युवती सक्षमीकरण -प्रशिक्षण यासाठी प्रशिक्षणसभागृहाची निर्मीती,शहरातील उर्वरीत रस्ते,नाली यासाठी ठराव घेतले गेले.
मूल शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात मते देवून मला निवडूण आणले.त्यांच्या पाठिंब्यामूळे व सन्माननीय सुधीरभाऊंच्या आर्शिवादाने पाच वर्षे पूर्ण केले.मूल वासिय जनतेच्या सहकार्याने व नगरसेविका -नगरसेवक,कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यांने पाच वर्षाचा काळ संपून आज कार्यकाळ संपला याचीमनात हळळळ तसेच भारमूक्त झाल्याचा आनंदही वाटत आहे असे म्हणतसर्वांचे आभार,मानत महात्मा गांधीच्या पुतळयाला हार घालून दिपप्रज्वलीतकरून मूल शहराचा उत्तमोत्तम विकास होत जावा असे मनोगत व्यक्त करत निरोप घेतला.