Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे सेंटर भद्रावती तर्फे भव्य कबड्डी सामने व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
येथील स्वर्गीय सेंसाई ( मास्टर ) प्रकाश कोवे तथा स्वर्गीय सेमफाई ( मास्टर ) मुन्ना उर्फ प्रशांत शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक ८ व ९ डिसेंबर २०२१ रोज सायंकाळी ५ वाजता कबड्डी सामन्याचे भव्य उदघाटन सोहळा यशवन्त राव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय प्राग नात दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने होत आहे
तसेच दिनांक ९ डिसेंबर ला रोज गुरुवार ला सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत श्री हनुमान मंदिर परिसर डॉ शिंदे हॉस्पिटल समोर मेन रॉड भद्रावती येथे घेण्यात येत आहे सकाळी ९ डिसेंबर ला ९ वाजता त्यांच्या फोटोला माल्यार्पण व पूजा अरच्या करून मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल व प्रार्थना होईल.
आंतरराष्ट्रीय कराटे पटू सेंसा ई ( मास्टर ) प्रकाश कोवे तथा ( मास्टर ) मुन्ना उर्फ प्रशांत शर्मा ( मास्टर ) म्हणून आपल्या जीवनाच्या अल्प काळात संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी कराटे प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांचे शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन समाजात स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगत आहे भद्रावती शहरात व तालुक्यात ते प्रख्यात होते. ते एक डब्लू सीयल कामगार नेते होते. व दुसरे एक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकांसमोर आले होते. त्यांचा वारसा पुढे नेण्या करीता त्यांच्या विध्यार्थ्यांनि त्यांचे नाव स्मुर्थीत आणले आहे दरवर्षी आगळा वेगळा कार्यक्रम घेत असते सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम होत राहिले आहे.
या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आव्हाहन मनीष सारडा, विजय ठेंगे, सुशील देवगडे, मोहन कोवे, अनिल मोडक, सतीश वनकर, प्रभात चौधरी, पवन हुरकट,
रत्नाकर साठे, डॉ प्रा. कार्तिक शिंदे, राजू गैनवार माजी नगरसेवक, विनोद वानखेडे नगरसेवक, नंदू लोहकरे, रितेश वनकर, सय्यद
अशफाक, मंगेश स्वानं, शीतल बहादे, चंदू खाडे, राजू डाखरे, निलेश नवराते, प्रशांत भडगरे, संतोष
लामकासे, विलास दाते, रवींद्र राव, मनोज पाझारे ललित कोलते, प्रशांत इंगळे, अमित शर्मा, डॉ नितीन सातभाई, शैलेश बंडावार, प्रशांत बरडे, इत्यादींनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.