आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेचे अनुदान थकीत
आनंदवन (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समिती या संस्थेच्या थकीत अनुदानाबाबत आमदार कपिल पाटील यांचा तारांकित प्रश्न आणि त्यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी लेखी उत्तर दिले.
महाराष्ट्र विधानपरिषद तारांकित प्रश्नोत्तरांत गुरुवार, दिनांक २३ डिसेंबर, २०२१ रोजी आनंदवन ( ता . वरोरा , जि . चंद्रपूर ) येथील महारोगी सेवा समिती या संस्थेच्या थकीत अनुदानाबाबत आमदार कपिल पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला.
आमदार कपिल पाटील : आनंदवन ( ता . वरोरा , जि.चंद्रपूर ) येथील डॉ . बाबा आमटे संस्थापित महारोगी सेवा समिती या संस्थेला निवासी कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय उपचार ( PHD ) तत्वांतर्गत प्रतिरूग्ण प्रतिमाह रूपये २२०० / - आणि पुनर्वसन ( LCS ) तत्वांतर्गत प्रतिरुग्ण प्रतिमाह रूपये २००० / - एवढे अनुदान भरती असलेल्या कुष्ठरुग्णांच्या संख्येनुसार दिले जाते , हे खरे आहे काय ,
श्री . राजेश टोपे : होय , हे खरे आहे
आमदार कपिल पाटील : असल्यास , सदर अनुदान संस्थेने खर्च केल्यानंतर परिरक्षणार्थ खर्चाच्या ८० टक्के या प्रमाणात परतफेड स्वरुपात संस्थेला दिले जाते , हे ही खरे आहे काय ,
श्री . राजेश टोपे : होय , हे खरे आहे
आमदार कपिल पाटील : असल्यास , महारोगी सेवा समितीचे सुमारे रुपये साडे पाच कोटी अनुदान थकीत असल्यामुळे संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार व पुनर्वसन करणे अवघड जात आहे , हे ही खरे आहे काय ,
श्री . राजेश टोपे : अंशत : खरे आहे .
आमदार कपिल पाटील : असल्यास , उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय , चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने महारोगी सेवा समितीचे थकीत अनुदान विनाविलंब अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे .
श्री . राजेश टोपे : महारोगी सेवा समिती , वरोरा , जि . चंद्रपूर या स्वयंसेवी संस्थेचे रुग्णालयीन व पुनर्वसन तत्वावरील सध्या एकूण अनुदान रक्कम रुपये २,९१,०८,००० / - थकीत आहे . अ ) रुग्णालयीन तत्वावरील शासन निर्णय क्र . कुनिका २०२० / प्र.क्र .५२२ / आरोग्य -५ , दिनांक २७ / ० ९ / २०२१ अन्वये ( जानेवारी २०२० ते सप्टेंबर , २०२० ) रक्कम रुपये १,१८,८०,००० / - सन २०२१ २२ च्या मंजूर अनुदानातून वितरीत करण्यात आले आहे . आ ) पुनर्वसन तत्वावरील शासन निर्णय क्र . कुनिका २०२० / प्र.क्र .५०६ / आरोग्य -५ , दिनांक २०/१०/२०२१ अन्वये ( ऑक्टोबर २०१ ९ ते सप्टेंबर , २०२० ) रक्कम रुपये १,४४,००,००० / - सन २०२१-२२ च्या मंजूर अनुदानातून वितरीत करण्यात आले आहे .
महारोगी सेवा समिती , वरोरा या संस्थेकडून विहीत कालावधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्याने निधी वितरण प्रस्ताव अपूर्ण असल्याने मान्यतेसाठी विलंब होत आहे. या अनुषंगाने त्रुटीची पूर्तता करण्याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडे शासनस्तरावरुन पत्रव्यवहार सुरु आहे .
( ५ ) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?
( ५ ) प्रश्न उद्भवत नाही .