जुन्नर नगरपालिकेच्या बहुचर्चित पाणी योजनेला मिळाली नगरपालिकेच्या सभेत अंतिम मंजुरी.
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपालिकेची विशेष सभा आज (दिनांक २३/१२/२०२१) रोजी दुपारी १२ वाजता नगरपालिका येथे आयोजित केली होती.
या सभेत माणिकडोह धरणातून पाणी योजना राबविण्यास अंतिम मंजूरी देण्यात आली.
सदर सभेसाठी नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत,, फिरोज पठाण, नरेंद्र तांबोळी, भाऊ कुंभार, जमीर कागदी, अक्षय मांडवे, अलकाताई फुलपगार, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, सना मन्सुरी , हजरा इनामदार, मोनाली म्हस्के, समीना शेख, कविता गुंजाळ, अविन फुलपगार, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
जुन्नर शहराच्या इतिहासात प्रथमच सुमारे ५० नागरिक, पत्रकार, इत्यादी देखील सदर सभेत उपस्थित होते. पाणी पुरवठा योजनेशी निगडित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इरिगेशन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ई. विभागांशी करारनामे, करून देणे हा हया मिटिंगचा मुख्य उद्देश होता.
दिनांक १६/१२/२०२१ रोजी झालेल्या सभेत सदरहू पाणी योजनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी व जमीर कागदी यांनी स्थगिती दिली होती.
त्यामुळे आजच्या मिटिंगकडे संपूर्ण जुन्नर शहरवासीयांचे लक्ष लागले होते. मिटिंगच्या सुरुवातीला श्री कागदी व समीना शेख यांनी सदरची सभा ही बेकायदेशीर असल्याचे सांगितले, तसा तक्रारी अर्ज त्यांनी मा. मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यावर नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सदरची सभा कायदेशीर असून पुढील कामकाज सुरू करावे असे आदेश दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी यांनी सदर योजनेची सर्व तांत्रिक माहिती सभागृहाला दिली. नगरसेवकांचे समाधान झाल्यानंतर नगरसेवक समीर भगत, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अलकाताई फुलपगार, दीपेश परदेशी यांनी नागरिकांच्या उपस्थितित सूचना व अनुमोदन दिले.
एकंदरीत च जुन्नर शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या योजनेसाठी प्रसंगी काही जरी झाले तरी चालेल परंतु हि योजना अंमलात आलीच पाहिजे. अशी भूमिका उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, समीर भगत व शिवसेना नगरसेवकांनी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या योजनेला विरोध नसून तांत्रिक बाबींची माहिती घेतल्यानंतर आमचा देखीलसदरहू योजनेला पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांकडून गटनेते फिरोज पठाण यांनी स्पष्ट केले.
जमीर कागदी व समीना शेख यांनी तटस्थ भूमिका घेतली.
सदरहू योजनेला मंजुरी दिल्याबद्दल नगरसेवकांचे व प्रशासनातील अधिकारी व उपस्थित नागरिक यांचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी आभार मानले.
श्रेयवादाच्या लढाई मध्ये जुन्नर शहराच्या विकासाला खीळ इथुन पुढे देखील कुणी घालू नये असे आव्हान करत सभा संपल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी जाहीर केले.