: म.से.स.वरोरा,आनंदवन द्वारा संचालित आनंद अंध विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालय आणि संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा यांनी संयुक्तपणे जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ठरल्याप्रमाणे ठीक 9:30 वा. पाहुण्याच्या प्रमुख उपस्थितीत निजबल इमारतीच्या आवारात दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई तसेच दिव्यांगजनांना प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व डाॅ.हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केल्यानंतर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळाचे अधिक्षक मा. नलगिंटवार सर यांनी प्रास्ताविक भाषण केले तर आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. भसारकर सर यांनी जागतिक अपंग दिनाचा इतिहास, अपंग विद्यार्थी व अपंगाच्या शाळांपुढील आव्हाने यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त मा. सुधाकर कडू सर यांनी भूषविले. अतिथी म्हणून म.से.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ता कविश्वरकाका तसेच ग्रामपंचायत आनंदवनचे सरपंच मा.सॊ.रुपालीताई दरेकर व उपसरपंच मा. शौकतभाई खान मंचावर उपस्थित होते. आभार प्रदर्शन आनंद अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.सेवकराम बांगडकर सर यांनी केले तर मा.दीपक शिव सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या दुस-या टप्प्यात आनंद मूकबधिर विद्यालयाच्या प्रांगणात क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात व्हॉलीबॉल, बकेट मध्ये बाॅल टाकणे , गोलात बाॅल मारणे, लिंबू चमचा, गोळा फेक असे विविध खेळ घेण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आदरणीय डाॅ.विकासभाऊ आमटे व डाॅ.भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद लाभले. मा.कौस्तुभदादा व सॊ. पल्लवीताई आमटे यांचेही पाठबळ प्राप्त झाले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तिन्ही शाळेतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.