Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१

रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते : बावनकुळे

रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण




कामठी : लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या निवासस्थानी नुकतेच रांगोळी स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. रांगोळीकलेमूळे मुलींना आणि महिलांना प्रोत्साहन मिळते  असे उदगार माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी बावनकुळे यांनी  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व मुलींचे आणि  महिलांचे अभिनंदन केले आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करा असे आयोजक सौ अरुणा बावनकुळे आणि सौ किरण मेश्राम यांना सांगितले आयोजक यांनी सुध्दा होकार दिले
 स्पर्धेचे पारितोषिक वितरण    *चंद्रशेखर बावनकुळे * यांच्या हस्ते तसेच नागपूरचे नगरसेवक *विक्की कुकरेजा,अजय अग्रवाल* यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून, डॉ. संदीप कश्यप, लाला खंडेलवाल, संगीताताई अग्रवाल,प्रितीताई कुल्लरकर,विनोद संगेवार,पुष्पराज मेश्राम, राजू बावनकुळे,*कमल यादव, सुनील चव्हाण, जितेंद्र खोब्रागडे, योगेश गायधने, अजय पाचोली,प्रमोद वर्णम, सतीश जैस्वाल, रंजना कश्यप, ज्योती चव्हाण, गायत्री यादव, लता शर्मा, चंदा तूरस्कर* संचालन सौ किरण मेश्राम, आभार राजू बावनकुळे यांनी मानले. यावेळी प्रथम तीन पुरस्कार *संस्कार भारती* ग्रुप गुंजन मनोज तामसेटवार, सेजल यादव,साक्षी बावनकुळे, निष्ठा नागपुरे,पायल सेसलवार, वैशाली वाघाडेआणि *ठिपक्यांची रांगोळी* दिशा दोरसेटवर, जानवी कुल्लरकर, आशा वंजारी,अक्षरा अंकतवार,प्राची पैडलवार, सlनवी दोरसेटवार,*मुक्त हस्त चित्र** माही ठवकर,शुभम श्रावनकर, प्राची दोरसेटवर, चित्रा मते,पायल कठाणे,साक्षी सlमृतवार,अलका गंधारे,आणि उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले,स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुली आणि महिला ,कार्यकर्ते  उपस्थितीत होते.


Rangolikales encourage girls and women: Bavankule

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.