जहाल नक्षली नेता , सेंट्रल कमिटी मेंबर , मिलिंद तेलतुंबडेसह २६ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
• ५० लाख इनामी जहाल नक्षली नेता सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडेस कंठस्नान .
● २० लाख इनामी डीव्हिसीएम व कंपनी ४ चा कमांडर लोकेश मडकाम यास कंठस्नान .
● १६ लाख इनामी कसनसुर दलम डीव्हिसीएम महेश गोटा कंठस्नान .
• मृत नक्षलवाद्यांमध्ये २० पुरुष व ०६ महिलांचा समावेश
उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गॅरापत्ती हद्दीत मौजा मर्दिनटोला जंगल परीसरात पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर कंपनी , कसनसुर दलम , टिपागड दलम , कोरची दलम , विस्तार प्लाटुन , मिलिंद तेलतुंबडे याचे सोबतचे पथक व इतर नक्षल पथक मिळुन मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर लागले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन अपर पोलीस अधीक्षक ( अभियान ) श्री . सोमय मुंडे यांचे नेतृत्वात मौजा मर्दिनटोला जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथक ( सी -६० ) व विशेष कृती दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक १३/११/२०२१ रोजी सकाळी ६:०० ते ६:३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ९ ० ते १०० नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला . त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला , जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला . सदर चकमक दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुरु होती . सुमारे ९ .३० तास चाललेल्या या चकमकीत पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला . चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी २० पुरुष नक्षलवादी ०६ महीला असे एकुण २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळुन आले . सदर २६ मृतकापैकी १६ नक्षलवाद्यांची ओळख पटलेली असुन १० मृतक नक्षल्यांची ओळख पटविणे सुरु आहे . २