मंगळवारी मनपात भव्य वितरण सोहळा
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
- रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेतील पारितोषिक आणि माझी वसुंधरा अभियान विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस
चंद्रपूर, ता. १८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेतील पारितोषिक आणि माझी वसुंधरा अभियानअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता होत आहे. मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात आयोजित सोहळ्यात लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत २०१६ पासून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत २ हजार ४२२ घरकुलाचे उद्दिष्ट होते. यातील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सध्या ३३५ लाभार्थ्यांच्या घराचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे अनेक गरीब कुटूंबाना हक्काचे घर उपलब्ध झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत या योजनेअंतर्गत २ हजार ४२२ घरकुलाचे उद्दिष्ट होते. यातील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ३३५ लाभार्थ्यांच्या घराचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेतील निवडक लाभार्थाना धनादेश वितरित करण्यात येणार आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात आली. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यातील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर मनपाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी केले आहे.
स्वच्छतादूत अनिकेत आमटे यांचा विशेष सत्कार
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे दरवर्षी शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते बद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे, यासाठी स्वच्छतादूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) म्हणून प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त मनपाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार केला जाणार आहे.
| Ramai Gharkul Yojana