घरफोडी करणारे कुख्यात चोर अवघ्या ७२ तासात चंद्रपुर शहर पोलीसांच्या ताब्यात
चंद्रपुर :- पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे दाखल फिर्यादी सरिता पालीवाल यांचे सांगणे प्रमाणे त्यांच्ये राहते घराला ताला लावुन बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोस्टयांनी ताला तोडुन आत प्रवेश करून त्यांच्या घरातील सोन्याचे व चांदीचे दागीने चोरून नेल्याने पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला.
यात एक सोन्याचा १ तोळ्याचा गोप, एक सोन्याचा पेंडल २ ग्रॅम, एक सोन्याची आंगठी २ ग्रॅम, २ नग सोन्याचे कानातील ताप्स, १५ नग चांदीचे पुरातण काळातील सिक्के, नगदी १००००/-रू असा एकुण अंदाजे ११५०००/- रू चा माल चोरीस गेला असल्याने हद्दितील माहितगार, पो.स्टे रेकॉर्डवरील आरोपी व संशयित आरोपिंची शोध घेण्यास पेट्रोलीग करीत असताना पोलीस स्टेशन चंद्रपुर हद्दित राहणारे संशयीत आरोपी नामे १) अंकुश उर्फ डेवीड गजानन वानखेडे, वय २७ वर्ष, रा. बाबानगर बाबुपेठ, चंद्रपुर २) वैभव उर्फ आउ परमेश्वर झाडे, वय २५ वर्ष, रा बाबानगर बाबुपेठ, चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी किरमे लेआउट, बाबुपेठ, चंद्रपुर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपी कडुन वरील पुर्ण सोन्याचे दागीने व चांदीची नाणी असा एकुन ११५००० रु चा माल हस्तगत करून अवघ्या ७२ तासात गुन्हा उघडकीस आणला..
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुधाकर अंभोरे तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षक फाल्गुन घोडमारे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरिक्षक निलेश वाघमारे, विजय कोरडे, सहाय्यक फौजदार शरिफ शेख, दौलत चालखुरे, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, नायक पोलिस कॉन्स्टेबल जयंता चुनारकर, रामकिसन सानप, सतिश टोंगलकर, सचिन बोरकर, शिपाई संताष बिया, रूपेश रणदिवे, चेतन गज्जलवार, प्रमोद डोंगरे, इमरान यांनी केली आहे.


