व्यसनमुक्त जीवन काळाची गरज - डॉ. आशिष बारब्दे
गेवरा येथे कर्करोग निदान शिबीर
निफन्द्रा/प्रतिनिधी
आजच्या काळात पिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे, कुठे तरी यावर आळा घालून व्यसनमुक्त जीवन जगणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन टाटा ट्रस्ट चे कँसर पोग्राम व्यवस्थापक डॉ आशिष बारब्दे यांनी केले,
दर वर्षी ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूर आणि सोबत फाउंडेशन संलग्नित जाणीव रुग्णालय गेवरा बुज. ता.सावली यांच्या संयुक्त विद्यमाने गेवरा या आदिवासी बहुल गावात कर्कराेग तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ९० नागरिकांची कर्कराेग तपासणी करण्यात आली. याप्रसंगी मुख, स्तन आणि गर्भाशय ची तपासणी करण्यात आली. यात पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोबत फाउंडेशन चे डॉ सूरज म्हस्के उपस्थित हाेते. यावेळ टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ आशिष बारब्दे, जिल्हा समन्वयक सूरज साळुंके व संपूर्ण टीम उपस्थित होते. सदर शिबिरात उपस्थितांना कर्कराेगाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्करोगाच्या लक्षणाविषयी व उपाचारा विषयी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी आदिती यांनी स्तन व इतर कर्कराेगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचार पद्धती, हा आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात खर्रा व तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढल्याने कर्कराेग बळावत असल्याची माहिती सूरज साळुंके यांनी दिली. डाॅ. आशिष बारब्दे यांनी प्रास्ताविकातून या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला. यावेळी गावातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार पुनम झाडे यांनी केले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव शेंडे, राजु धोटे, विवेक राऊत,अविनाश बारापात्रे, अजय भांडेकर, उषा देशमुख, अश्विनी मोहुर्ले, कीर्ती पिंगे, प्रीती चौधरी, शारदा श्रीरामे व जाणीव रुग्णालय च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.