Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करा - छगन भुजबळ Chhagan Bhujbal

*ओबीसींच्या आरक्षणासाठी एक होण्याची गरज, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करा - छगन भुजबळ*

*चंद्रपूर येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मेळावा




*मूल-चंद्रपूर, दि.१८ ऑक्टोबर:-
ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मूल जि. चंद्रपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित ओबीसी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, प्रा. रामभाऊ महाडोळे,जगदीश जुनगरी, महिलाध्यक्ष शशिकला गावतुरे,राजेंद्र वैद्य,सुमित समर्थ यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर-गडचिरोलीसह आठ जिल्हातील ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत केले. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करा. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे.न्यायालयीन लढाई देखील राज्याची सुरू आहे मात्र न्यायालयाला हवी असलेला इंपिरिकल डाटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे हे समजावून सांगताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहासच जनतेसमोर मांडला यावेळी आरक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष देखील श्री भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मांडला. आज अनेक जण इतिहासाची मोडतोड करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उभे केले जात आहेत मात्र जनतेने यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.