Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ग्रामीण रुग्णालयातील धर्मशाळा सुरू करा- अनिता वानखेडे



स्टार पोलीस टाइम्स ब्यूरो

पाचोड येथे तीस खाटाचे ग्रामीण रूग्णालय आहे. येथे ट्रामा केअर सेंटरही आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ५२ वर अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. या कारणाने पाचोड रूग्णालयात नेहमी रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांचा राबता असतो. अशात पावसाळ्याची भर पडून या पावसात रूग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांचे हाल होत असून सद्य स्थितिला "डाँक्टर आत बसू देईना बाहेर धर्मशाळा सापडेना" अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. धर्मशाळा ही गेल्या अनेक वर्षापासून भंगार गोदाम बनल्यामूळे रूग्णांच्या नातेवाईकांने बसावे कुठं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिता वानखेडे यांनी पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांची भेट घेऊन (दि.१८) रोजी निवेदन देऊन धर्मशाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून धर्मशाळा बनवण्यात आलेली आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील धर्मशाळेत चक्क भंगारचे सामन भरुन ठेवल्याने या धर्मशाळेला भंगाराच्या गोदामाचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.

तसेच एवढे मोठे  ग्रामीण रुग्णालय असून सुद्धा या रुग्णालयांमध्ये  येथील रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून या रुग्णांची मोठी परवड होत असते. तसेच पिण्याचे पाणी अशुद्ध मिळत असल्याने हे रुग्ण अधिक आजारी पडण्याचा धोका असतो. येथे रुग्णासाठी पाण्याची टाकी बनवण्यात आलेली असून ही पाण्याची टाकी बंद पडलेली आहे. या धर्मशाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनेक वेळा लाख रुपये निधी उचलून देखील धर्मशाळेची दुर्दशा झालेली आहे. ही धर्मशाळा एका खाजगी व्यक्तीला भाडेतत्वावर हॉटेल चालवण्यासाठी दिलेली होती.सद्यस्थितीला या धर्मशाळेला कुलूप लागले असून या लागलेल्या कुलपामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना निवाऱ्यासाठी कुठल्या प्रकारची सुविधा नसल्याने नातेवाईकांना बाहेर उघड्यावर रात्र काढावी लागते. रात्री-अपरात्री रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना चक्क धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या चहाच्या हाँटेलचा सहारा घेऊन राहून रात्र काढावी लागत असल्याचे दिसत आहे. या रुग्णालयाच्या क्षेत्रात जवळपास पन्नास हजार लोकसंख्या आहे.          

धर्मशाळेत वैद्यकीय विभागाने भंगार भरून ठेवल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क वीस रुपयेची खर्च करावे लागत असल्याने नातेवाईकांना नाहक खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज प्रसुतिसाठी महिलां मोठ्या प्रमाणात असतात परंतु इंथे सुविधा नसल्यामुळे प्रसुतिसाठी आलेल्या महिलांना एकट्यांनाच रूग्णालयात राहावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. तरी वरिष्ठांनी याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करुन सदर धर्मशाळा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता वानखेडे यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.