Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

विहामांडवा येथे कायदेविषयक शिबिर संपन्न


विहामांडवा / इम्तीयाज शेख

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे हनुमान मंदीरात आजादी का अमृत महोत्सव व विधी सेवा आठवडा या अंतर्गत पैठण न्यायालयाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पैठण न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. एन भावसार तर प्रमुख अतिथी म्हणून पैठण न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश व्ही एस वाघ आणि तिसरे न्यायाधीश आर एस गुळवे हे होते. यावेळी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत असलेल्या विविध कायद्याविषयी माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पैठण वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष ॲड.जाधव यांनी केले .यावेळी ॲड. खडसन, ॲड. शाहीन शेख यांनी  महिला विषयी असलेल्या कायदे विषयी मार्गदर्शन केले.

यानंतर प्रमुख पाहुणे आर एस गुळवे यांनी तालुका विधी सेवा समिती मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा याविषयी माहिती दिली व कायदा हा सर्वांसाठी असल्याने कायद्याची माहिती ही सर्वांना असायला हवी असे मत व्यक्त केले.
 दुसरे न्यायाधीश व्ही एस वाघ यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता व आपापसातील मतभेद तडजोडी आधारे दूर करता येतील याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रमुख न्यायाधीश भावसार यांनी होणारे तंटे गावातच ग्रामपातळीवर कसे निवारण करता येईल याविषयी महत्वाची माहिती दिली.  कार्यक्रमाच्या नंतर न्यायाधीश मंडळी वकील बांधवांनी गावात कायद्या विषयक माहिती पत्रकाचे वाटप केले. यावेळी पैठण वकील संघाचे ॲड. ए.डी. सानप, ॲड एन डी झुंजे,ॲड एस एल जाधव, ॲड एम ए सय्यद , ॲड शेख शकील ,ॲड. व्ही जी मुळे, ॲड पि के काकडे, ॲड डी जे पहिलवान, ॲड पंकज काकडे, ॲड गौतम निंबाळकर, ॲड संदीप शिंदे , ॲड संदीप नाडे ॲड सचिन पाटील ,उद्धव नजन दसपुते, ॲड जी एस काकडे, ॲड. प्रताप वाकडे, ॲड शेख शाईन, ॲड आरती राका, ॲड राहुल धायकर तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री राठोड, नाटकर, खाटीकमारे, जराड उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. इमरान शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. राहुल धायकर यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विहामांडवा ग्रामपंचायत  ग्राम विकास अधिकारी घालमे ग्रां. प लिपिक महेश आवारे, ग्राम रोजगार सेवक इरफान शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.