:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेतक-यांना सर्पदंश व रानटी डुकराच्या हल्ल्यात कुटूंबातील सदस्याचा मृत्यु झाल्याने आज (दि.५) ला आर्थीक मदत करण्यात आली.
सदर योजना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदनसिंह रावत यांच्या सूचनेनुसार बॅंकेच्या संचालक मंडळाने ठरविल्यानुसार शेतकरी कल्याण निधी अंतर्गत राबविण्यात येत आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील रामेश्वर वासुदेव शेंडे यांचा बैल सर्पदंशाने मरण पावला. शेगाव खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर जांभुळे यांचे वडील श्रावण जांभुळे हे रानटी डूकराच्या हल्ल्यात मरण पावले. वडगाव (आबमक्ता) येथील विकास पुनवटकर यांचा बैल सर्पदंशाने मृत झाला. तर खेमजई येथील शेतकरी अशोक खंगार यांची मुलगी सोनाक्षी खंगार ही सर्पदंशाने मरण पावली. या सर्वांना जिल्हा बँकेतर्फे आर्थीक सहकार्य करण्यात आले.
यावेळी बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, संचालक डॉ. देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर, बाळू भोयर, आदी उपस्थित होते.
बैंकेतर्फे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांचे कुटूंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, वन्यजीव प्राण्यांमुळे मृत्यू, गुरे ढोरे मृत्यू पडल्यास, गोठा जळाल्याने व शेतातील धान्य, पिक जळाल्याने होणा-या नुकसानाची भरपाई स्वरुपात देण्यात येत आहे.
यासाठी शेतकरी, शेतमजूर बंधूंना पोलीस एफआयआर, पटवारी पंचनामा जोडून संबधित शाखेत अर्ज करावा, असे सांगण्यात आले.
रवि शिंदे यांनी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा कोरोनाने मृत झालेल्या व गरीब गरजु पालकांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येणार आहे, त्यासाठी १३ ऑक्टोबर २०२१ पासून नोंदणी सुरु होत असल्याचे सांगितले.