कोल्हापूर - जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथून बेपत्ता झालेल्या आरव केसरे या बालकाचा मृतदेह संशयास्पद रित्या त्यांच्याच घराच्या मागे आढळून आल्याचे समजते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेलेला आरव वय ६ वर्षे दि.३ ऑक्टोबर पासून बेपत्ता झाला होता. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न झाला. परंतु तो काही सापडला नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज दि.५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान आरवचा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागे संशयास्पदरित्या कोणीतरी अज्ञाताने आणून ठेवला. दरम्यान मृतदेहावर गुलाल टाकण्यात आला असून, शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे समजते.
दरम्यान हा प्रकार नरबळी किंवा, खुनशी प्रवृत्तीतून झाला असावा, अशी चर्चा परिसरातून ऐकावयास मिळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयुर्वेदिक दुकानातून मंत्र-तंत्र साठी लागणारे नख्या, लिंबू, बीबे,यांचा खप मोठा आहे!म्हणजेच मांत्रिकांची संख्याही मोठी आहे त्यांची नोंद पोलीस खात्याकडे करावी !
या खुना मागे नरबळीची शक्यता नाकारता येत नाही. तपास अधिकाऱ्यांनी याचा सखोल तपास करावा असे पत्रक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल चव्हाण, गीता हसूरकर, बी.एल.बरगे, हरीश कांबळे, अभिजीत पाटील,इत्यादींनी काढले आहे.