:- यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुधीर मोते ,पर्यवेक्षक ताजणे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, पूजनाने करण्यात आली .अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वानखेडे सर यांनी महात्मा गांधीच्या जीवनातील तत्त्वज्ञान सर्वांनी अंगीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .डॉ. सुधीर मोते यांनी मार्गदर्शन करताना लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.लाल बहादूर शास्त्री हे
मूर्ती लहान कीर्ती महान असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे प्रतिपादन केले .याप्रसंगी प्राध्यापक ढोक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक ताजने सर यांनी केले . सूत्रसंचालन आत्माराम देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश नंदनवार सर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.