प्राचीन औंढा नागनाथ येथील महाविद्यालयाला सुधीर मुनगंटीवार यांचे नाव
औंढा नागनाथ ( Aundha Nagnath ) हा महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. औंढा नागनाथ येथे माजी अर्थमंत्री,लोकलेखा समिती प्रमुख मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या कर्तृत्ववान कार्यास शोभेल असे शैक्षणिक ज्ञान दानाचे पवित्र कार्य सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नागरिकांनी चंद्रपूर सारख्या अंतर दुर असलेल्या नेत्याचे आपल्या गावच्या विकासात भर घातली याचे उतराई होण्यासाठी त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू केली आहे,इयत्ता १ ली ते १२ वि पर्यत इथे विध्यार्थी शिक्षण घेत असून, आज ही संस्था या भागातील नावारूपाला आलेली शाळा म्हणून गणली जाते.
आपल्या गावच्या शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधीना अर्थात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे औंढा नागनाथ वासीयांनी विशेष आभार मानले. हे विशेष आभार म्हणजे चक्क आपल्या गावातील महाविद्यालयाला मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय असे नाव त्यांनी दिले आहे. औंढा नागनाथ या गावाला भाऊंनी विकासासाठी निधी दिला आणि त्या गावांनी भाऊंची नेहमी साठी आठवण राहावी असा विचार इतक्या दूरचा विचार इथे दिसून येतो. असे अनोखे आभार मनाला सुखावणारे आहेत.
https://convertify.app/demo/khabarbat.apk
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. उच्चविद्याभूषित सुधीरजी यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. आता चंद्रपूरच्या लोकांच्या समस्या सोडवणे हेच आपले ध्येय मानून त्यांनी तेथील अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे चंद्रपूरचे सहयोगी असे म्हणतात की, ‘सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतःला झोकून देणारा हा एकमेव नेता आहे.’
The name of the college at ancient Aundha Nagnath is Sudhir Mungantiwar