Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

भाजपाच्या सेवा समर्पण अभियानाचा पुरस्कार वितरण कार्यक्रमाने समारोप

 माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांची उपस्थिती 


पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत भाजपा चंद्रपुर तर्फे सेवा समर्पण अभियान राबविण्यात आले.या दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या पुरस्कार वितरण समारंभाने सेवा व समर्पण अभियानाचा समारोप 29 ऑक्टोबरला केला जाणार आहे.विशेष म्हणजे यावेळी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते शुक्रवार(29 ऑक्टोबर,)ला आय एम ए सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण केले जाणार आहे.याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,मनपा गटनेत्या जयश्री जुमडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारने,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर यांची तथा भाजपा पदाधिकारी उपस्थिती राहणार आहे.

 भाजपा तर्फे सेवा व समर्पण अभियान अंतर्गत  सशक्त भारत, समृद्ध भारत या विषयावरील निबंध स्पर्धेत अ गटात
  • (प्रथम पुरस्कार) कु.पलक गंगाधर माणुसमारे,
  • (द्वितीय पुरस्कार) कु.ऋतुजा गजानन वैरागडे
  • (तुतीय पुरस्कार) विशाल अनिल सोनटक्के यांनी प्राप्त केला आहे.तर ब गटात
  • प्रथम पुरस्कार सत्यवान अशोक आत्राम,
  • द्वितीय पुरस्कार मोहम्मद जीलानी,
  • तृतीय पुरस्कार रोशन सुरेश भोयर, यांनी मिळविला.

चित्रकला स्पर्धेत अ गटसाठी
  • प्रथम पुरस्कार राहिली चंद्रशेखर बारापत्रे,
  • द्वितीय पुरस्कार पारस रवींद्र वनसिंगे,
  • तृतीय पुरस्कार स्वरा विलास कात्रोजवार,यांनी तर ब गटासाठी
  • प्रथम पुरस्कार अथर्व एस. बारापात्रे,
  • द्वितीय पुरस्कार यश मिलिंद सहारे,
  • तृतीय पुरस्कार प्रशांत वि दुर्गे, यांना जाहीर करण्यात आला आहे.,या सोबत
  • गौरव विशेष प्रदर्शनी,मॅरोथॉन,


गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

bjp sewa samrpan abhiyan

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.