46 कोटी रुपये खर्च; मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळ थंडबस्त्यात | आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
राजुरा | माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 2018 मध्ये राजुरा तालुक्यात मूर्ती येथे ग्रीनफिल्ड विमानतळ निर्मिती करण्याबाबत प्रकल्पास सुरुवात करण्यात आली. यासाठी माजी आमदार एडवोकेट संजय धोटे यांनी याबाबत पाठपुरावा केला. प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासाठी जवळपास 46 कोटी रुपये खर्च झालेले आहेत.मात्र राज्यात सत्ता बदलल्यानंतर मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानळाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मूर्ती व परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार निवेदन देऊन विनंती करण्यात आले.

यावेळी माजी आमदार एडवोकेट संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव उपस्थित होते.
चूनाळा विहीर गाव जिल्हा परिषद क्षेत्रात कुठलाही उद्योग नसल्यामुळे युवक वर्ग बेरोजगार आहे. मूर्ती येथील विमानतळ प्रकल्प पूर्णत्वास आल्यास तालुक्यातील व जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल. स्थानिक शेतकऱ्यांना व युवकांना रोजगार उपलब्ध होईल. या भागात नैसर्गिक साधन संपदा विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योजक येतील. कापूस उत्पादक क्षेत्र असल्यामुळे मोठी गुंतवणूक होईल. ताडोबा सारखे जागतिक कीर्तीचे व्याघ्र प्रकल्प या जिल्ह्यात असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे होत असल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. सर्वाधिक महसूल देणारा हा जिल्हा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने विमानतळाची नितांत आवश्यकता आहे. या भागातील विमानतळाचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

Greenfield Airport in Murthy