सौंदड रेल्वे स्थानकावर जल्लोषात
गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडीचे जंगी स्वागत
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मानले रेल्वे प्रशासनाचे आभार.
15 सप्टेंबरला केले होते आंदोलन
संजीव बडोले प्रतिनिधी .
नवेगावबांध दि.29 सप्टेंबर:-
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ. शिवकुमार गणविर, राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. हौसलाल राहांगडाले यांचे नेतृत्त्वात व आयटक सलग्न कामगार संघटनांनी गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२१ ला सौंदड रेल्वे स्थानकावर आंदोलन केले होते.रेल्वे त्वरीत सुरू न झाल्यास १५ दिवसात या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने घेत मागिल दिड वर्षांपासून बंद असलेली गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर गाडी २८ सप्टेंबर रोजी मंगळवार पासून सुरू करण्यात आली. सदर पॅसेंजर रेल्वे गाडी गोंदिया वरून सकाळी ७.४० वाजता सुटून सौंदड रेल्वे स्थानकावर सकाळी ८.४० वाजता रेल्वे स्थानकावर पोहचताच तिचे मोठ्या हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले.तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व आयटकचे वतीने रेल्वे चालक ,अधिक्षक व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रेल्वे विभागाने मागिल वर्षी मार्च महिन्यात कोविड-१९ कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.मात्र पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या.त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी तसेच गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी जीवनदायी असलेल्या या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला.तसेच गरीब व मध्यमवर्गीय लोकांचा स्वस्ताचा प्रवाश हिरावला गेला होता.कामगार, शेतकरी, शेतमजूर, कमी वेतनावर काम करणारे रोजंदारी कामगारांचा या रेल्वे गाडीने प्रवास करीत होते.पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक सलग्न कामगार संघटनाचे वतीने सौंदड रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले होते. अखेर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात पत्रक जारी करून मंगळवार पासून सदर गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडी सुरू केली. सकाळी ८.४० वाजता सौंदड रेल्वे स्थानकावर पोहचताच तिचे स्थानिक नागरिक व कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकाऱ्यांमार्फत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी रेल्वे इंजिन वर फुलांचा हार लावून स्वागत केले .रेल्वे चालक अधिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ . शिवकुमार गणविर,राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. हौसलाल राहांगडाले,माजी राज्य कौन्सिल सदस्य काॅ. रामचंद्र पाटील, साकोली तालुका माजी सचिव पी.एस.मेश्राम ,तालुका सचिव काॅ. दिलीप उंदिरवाडे, सडक अर्जुनी तालुका सचिव काॅ. अशोक मेश्राम, भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष काॅ.सुनंदा रामटेके, सचिव मिनाक्षी बोंबार्डे, कार्याध्यक्ष देवांगना सयाम,वासंती शहारे किशोर बारस्कर, राजु बडोले आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे विभागाने ने गोंदिया बल्लारशा रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले व तिकिटाचे वाढवलेले दर कमी करण्याची मागणी कॉमरेड शिवकुमार गणवीर यांनी केली.