Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

पथदिव्यांच्या मागणीसाठी अर्जुनीमोर सरपंच संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यश

पथदिव्यांच्या मागणीसाठी अर्जुनीमोर सरपंच संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यश

आंदोलन मागे, पथदिव्यांची उद्यापासून वीजजोडणी





संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.२३.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी पथदिवे सुरु करण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आली.मात्र शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तालुक्यातील सरपंच,उपसरपंच संघटनेच्या वतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अर्जुनी मोरगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर तालुक्यातील सरपंचांनी ठिय्या दिला. दरम्यान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, उद्यापासून दोन दिवसात पथदिव्यांची जोडणी महावितरण च्या वतीने करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत कडे शिल्लक असलेला वीज बिलाची रक्कम याबाबतची माहिती आपल्याकडे देण्यात यावी. तेवढा निधी शासनाकडून ग्रामपंचायतींना देण्यास आपण प्रयत्न करू. असे आश्वासन आमदार महोदयांनी यावेळेस दिले. त्यानंतर सरपंच संघटनेने आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. तसेच महावितरणचे उपविभागीय अभियंता शहारे यांनी उद्यापासून महावितरण पथदिव्यांची वीज जोडणी सुरू करेल, असे यावेळी सांगितले .शासनाने थकीत बिलांचा महावितरण कंपनीला भरणा केला नाही,परिणामी ग्रामपंचायतीचे पथदिवे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.नागरिकांना सणासुदीच्या दिवसात अंधारात राहावे लागले.यासंदर्भात राज्य सरकार,लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार निवेदने सादर करण्यात आली होती. थकीत बिलांच्या भरणा करण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र तीन महिने लोटूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ तालुका अर्जुनी मोरगाव च्या वतीने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज २३ सप्टेंबर रोज गुरुवारी अर्जुनीमोर येथील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे,सरचिटणीस अशोक कापगते,सरपंच अनिरुद्ध शहारे,उपसरपंच रघुनाथ लांजेवार ,संजय खरवडे,प्रकाश शिवणकर,होमराज पुस्तोडे,डॉ.दीपक रहिले,भोजराम लोगडे,युवराज तरोने,कुंदा डोंगरवार,किशोर ब्राम्हणकर, विश्वनाथ बाळबुद्धे, लिलेश्वर खुणे आणि सरपंच सेवा संघाचे सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.