दोन हजारांची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सापडला
आशिष शिंदेला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली रंगेहाथ अटक
चंद्रपूर - पंचायत समिती जिवती , जि . चंद्रपूर येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ( कंत्राटी ) आशिष उत्तमराव शिंदे , वय ३० वर्षे , पंचायत समिती जिवती जि . चंद्रपूर यांनी २,००० / - रूपयांची लाच स्विकारल्याने त्यांचेविरूध्द अॅन्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे .
तक्राररदार हे घोडाअर्जुनी ता . जिवती , जि . चंद्रपूर येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात . तक्रारदार यांचे वडील व आजोबा यांच्या नावाने असलेल्या घराच्या बांधकामाकरीता पंतप्रधान आवास योजना अंतर्गत प्रत्येकी १,४८,००० / - रूपये असे एकुण २ , ९ ६,००० / - रूपये मंजुर झालेले होते . त्यानुसार घराचे बांधकामाचा तिसरा टप्पा पुर्ण झाल्याने तिसऱ्या टप्प्यांतर्गत मिळणारे प्रत्येकी ४५,००० / - रूपये असे एकुण ९ ०,००० / - रूपये मिळण्याकरीता पंचायत समिती जिवती येथे बील सादर केले होते . त्यानुसार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे हे बांधकाम पुर्ण झाले किंवा कसे याबाबत शहानिषा करण्याकरीता तकारदार यांचे राहते घरी धोडाअर्जुनी येथे दिनांक १४ / ० ९ / २०२१ रोजी गेले होते . त्यांनी घराचे बांधकामाचे पाहाणी केली तेव्हा तकारदार यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे यांना घराचे तिसऱ्या टण्यातील बांधकाम पुर्ण झाले असुन तिसऱ्या टप्यातील रक्कम मंजुर करून देण्याबाबत म्हटले असता , ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिदे यांनी “ तुला तिसऱ्या टप्प्याची रक्कम लवकरात लवकर पाहिजे असेल तर मला दोन्ही घराचे कामाकरीता एक - एक हजार रूपये असे एकुण २,००० / -रू दयावे लागेल , तेव्हाच तुझे बिल मंजुर होईल अन्यथा होणार नाही . " असे म्हणुन तकारदार यांना २,००० / - रूपये लाच रक्कमेची मागणी केली . परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
तक्रारदाराने दिलेल्या तकारीची पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे यांनी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले . त्यामध्ये दिनांक १६ / ० ९ / २०२१ रोजी पडताळणी दरम्यान ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आशिष शिंदे यांनी तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घराच्या बांधकामाकरीता तिसऱ्या टप्प्यातील रक्कम मंजुर करून देण्याकरिता २,००० / - रु . लाचेची मागणी करून २,००० / -रू लाच रक्कम कार्यालय पंचायत समिती जिवती , जि . चंद्रपूर येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले . त्यावरून आरोपी विरूध्द् पोलीस स्टेशन जिवती जि . चंद्रपूर येथे गुन्हा दाखल केला आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अप्पर पोलीस अधिक्षक श्री . मिलींद तोतरे , ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उपअधिक्षक श्री.अविनाश भामरे , ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे , पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ . संतोष येलपूलवार , रोशन चांदेकर , संदेश वाघमारे , म.पो. शि . समिक्षा भोंगळे , चापोशि . सतीश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर हे करीत आहेत .
A rural housing engineer was found taking a bribe of Rs 2,000