Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०९, २०२१

मराठी भाषेत लिहिताना मराठीमध्ये कसे टाइप करावे?

 


मराठी भाषेत लिहिण्यासाठी मराठीत (देवनागरी लिपीत) कसे टाइप करावे?

युनिकोड प्रणाली

मराठीमध्ये टाईप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी प्रणाली म्हणजे युनिकोड. ही विविध प्रादेषिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची (कीबोर्ड) सर्वमान्य प्रणाली आहे. यामध्ये मराठीसह विविध देशांतील काहीशे भाषांचा समावेश आहे. संगणकावर मराठी टाईप करण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदीच सोपे आहे.

  1. सर्वप्रथम कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन ‘रिजनल अॅन्ड लँग्वेज’ हा पर्याय स्वीकारून त्यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय स्वीकारा.
  2. त्यातील पहिल्या पर्यायासमोर ‘अ‍ॅड' असा पर्याय असेल तो निवडा. त्यानंतर पुन्हा ‘अ‍ॅड' असे म्हणा.
  3. मग तुम्हाला तुमची 'ऑपरेटिंग सिस्टम' इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्याय दिसतील. यामध्ये ‘मराठी'चा पर्याय असेल तो निवडा. यानंतर कीबोर्ड निवडा आणि मग ‘ओके' म्हणा.
  4. तुमची 'विंडोज सिस्टम' जुनी असल्यास काही कारणास्तव ‘मराठी' हा पर्याय दिसत नसल्यास अशावेळी ‘हिंदी' हा पर्याय निवडता येऊ शकतो. दोन्ही भाषांची ‘लिपी' सारखीच असल्याने ‘हिंदी' भाषा निवडूनही तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता.
  5. यानंतर तुम्हाला खालच्या टूलबारमध्ये उजव्या बाजूला ‘ईएन' (EN) अशी इंग्रजी अद्याक्षरे दिसतील. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला ‘एमआर’ (MR) ही अद्याक्षरेही यादीत दिसतील. ‘एमआर’ या मराठीच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही संगणकावर युनिकोडच्या मदतीने मराठी टाइप करू शकता.
  6. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हाताच्या बोटांवर बदल करायचा असल्यास कीबोर्डवरील ‘कंट्रोल' बटण दाबून ठेवून ‘शिफ्ट' बटण दाबल्यास तुम्ही मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून ‘मराठी'वर जाऊ शकता.

    * मराठी टाइप करण्यासाठी तुम्हाला ‘इनस्क्रिप्ट' हा कळफलक (कीबोर्ड) शिकावा लागेल.

(छायाचित्र - इंडिया टाइपिंग)

गुगल इनपुट

युनिकोड कळफलकाची (कीबोर्ड) ची सवय होईपर्यंत इंग्रजीतून मराठी टाइप करावयाचे असेल तर त्यासाठी 'गुगल इनपुट'सारखे पर्याय संगणकावर वापरता येऊ शकतात. सदर टूल ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासात तुमचा संगणक घेऊन गेला नसाल तर मोबाइलवरी कुठल्याही ब्राऊजरमार्फत ऑनलाइन टूलचा वापर करता येऊ शकतो. तिथे मराठी मजकूर टाइप केल्यावर कॉपी करून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तो छापता (पेस्ट करता) येऊ शकतो.

संगणकावर मराठी टाइप करण्यासाठी, गुगलच्या क्रोम ब्राउझर ब्राउझरमध्ये गुगल इनपुट टूल्स[1] (Google Input Tools) नावाचं एक्सटेंशन आहे. ते स्थापित करून मराठी टाइप करता येऊ शकते. यासाठी सर्वप्रथम;

  1. 'गुगल इनपुट टूल' डाउनलोड करा.
  2. दुवा उघडल्यानंतर, क्रोम (Chrome) एक्सटेंशन डाउनलोड करा वर क्लिक करा.
  3. स्क्रिनवर जे पृष्ठ उघडेल, त्यात अॅड टू क्रोम (Add to Chrome) हा पर्याय निवडा. इन्स्टॉल पूर्ण झाल्यावर सर्व प्रमुख भारतीय भाषा तुम्हाला दिसतील.
  4. गुगल क्रोम (Google Chrome) एक्सटेंशन पर्यायावर जा आणि मराठी भाषा निवडा.
  5. आता तुमच्या संगणकावर मराठी टाइपिंग सहज करता येईल. तुम्ही ‘नमस्ते’ असे टाइप करू इच्छित असल्यास, इंग्रजीत Namaste लिहा, नंतर हे आपोआप "नमस्ते" मध्ये रूपांतरित होईल. हा मजकूर कॉपी करून आवश्यक त्या ठिकाणी वापरता येतो.

(छायाचित्र - स्क्रिनशॉट)

मोबाईलवर मराठी टाइपिंग

मोबाइलवर मराठी टाइप करण्यासाठी अँड्रॉईडसाठी गुगल प्लेस्टोरमध्ये आणि आयफोनसाठी अॅपस्टोरमध्ये विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युनिकोडमध्येच म्हणजे मंगल फाँटमध्ये टाइपिंग होत असल्यामुळे तो कुणालाही कुठेही वाचता येऊ शकतो.

अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग

अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंगसाठी करण्यासाठी गुगल इंडिक किबोर्ड (Google Indic Keyboad[2]) हे अधिकृत अॅप ‘गुगल'ने डेव्हलप केलेले आहे.

  1. गुगल प्लेस्टोरमधून गुगल इंडिक किबोर्ड (Google Indic Keyboard) हे अॅप इन्स्टॉल करा.
  2. इन्स्टॉल केलेले अॅप ओपन करा. त्यात तुम्हाला हे अॅप कीबोर्ड म्हणून सेट करायचा पर्याय येईल. त्या पर्यायाची निवड करा.
  3. त्यानंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.त्यातून मराठी भाषा निवडा.
  4. आता तुम्ही ‘Namaste' असे इंग्रजीत टाईप केल्यास ते ‘नमस्ते' असे मराठीत टाईप झालेले असेल.

    * याशिवाय गुगल प्ले स्टोरमध्ये मराठी कीबोर्ड असे शोधल्यास मराठी टाईप करण्यासाठीच्या अॅप्सचे अनेक पर्याय समोर येतील.

(छायाचित्र - गुगल प्ले स्टोर)

आयफोन किंवा आयपॅडवर मराठी टाइपिंग

आयफोन किंवा आयपॅडवर ज्या ठिकाणी टाईप करायचं आहे ते अॅप उघडा.

उदा. Gmail, Messaging कीबोर्डच्या तळाशी पृथ्वीचं आयकॉन () असेल त्यावर टॅप करून दाबून धरा.

त्यानंतर ‘सेटिंग' आणि मग ‘लँग्वेजेस'मध्ये 'अॅड लँग्वेजेस' टॅप करा. इथे ‘मराठी' निवडा आणि तुमचा आयफोन मराठीत टाईप करण्यासाठी तयार असेल.

वर नमूद केलेल्या पर्यायांव्यतिरिक्तही मराठी टाइपिंगचे काही सोपे पर्याय तुम्हाला ठाऊक असतील तर ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
मातृभाषेत संगणकावर किंवा मोबाइलवर टाइप करण्याचं सुख काही वेगळंच आहे. यामुळे मराठी भाषेच्या प्रसाराला आणि दस्तावेजीकरणात तुम्ही मोठा हातभार लावत आहात. 
मराठी टाइपिंगसाठी शुभेच्छा!


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.