या वरच्या निकषावर दूध पूर्णपणे उतरते. अनेकसार्या लोकांना नियमितपणे दूध पिऊनही काहीही त्रास होत नाही आणि त्यांना ते सवयीचे पण झालेले असते, अशा प्रौढांसाठी दूध हे आहारातला एक चांगला घटक ठरू शकेल, परंतु ज्या लोकांना ते सवयीचे नाही किंवा ते सेवन करून काही त्रास होतात अशा लोकांनी मात्र ते टाळणेच इष्ट आहे.
दूध आहारात अजिबातच नाही म्हणून कोणताही वाईट परिणाम शरीरावर होत नाही हे मी स्वतःच्या अनुभवावरून सुद्धा ठामपणे सांगू शकतो. मला दूध नित्यनियमाने प्यायले तर खूप सारे त्रास होतात, म्हणून मी कधीच दूध पीत नाही तरीपण मी अतिशय चांगले निरोगी आयुष्य जगत आहे आहे. दुधापासून जे काही चांगले घटक शरीराला मिळतात ते इतर आहारातून पण सहजपणे मिळवता येतात. त्यामुळे दुधावाचून प्रौढ मानवाचे काहीच अडणार नाही, पण ज्यांना ते खूप सवयीचे आहे आणि ते पिऊन काही त्रास होत नाही अशा लोकांनी ते प्यायला हरकत नाही.
मुलाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी कोणते दूध सर्वात योग्य आहे आणि कोणत्या वयात, किती दूध प्यावे.
कॅल्शियम आणि हाडांच्या सामर्थ्यासाठी दूध आवश्यक आहे. एका ग्लास दुधात कमीत कमी 146 कॅलरी असतात, ज्यामध्ये 8 ग्रॅम फॅट असते. दुसरीकडे, टोन्ड दुधामध्ये 102 कॅलरी आणि 2 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. स्किम्ड दुधात 83 ग्रॅम कॅलरी असतात, तर त्यामध्ये फॅट नसते.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की गाई आणि म्हशीच्या दुधापेक्षा चूर्ण दूध लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर आहे. कारण गाई किंवा म्हशीच्या दुधात भेसळ होऊ शकते.
मुलांसाठी असे म्हटले जाते की गायीचे दूध चांगले आहे. कारण म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त फॅट असते. तसेच बरेच लोक नवजात शिशुंना बकरीचे दूध देतात, जे चुकीचे आहे. आपण लहान मुलांना आईचे दूध किंवा लहान मुलांचे फॉर्म्युला दूध द्यावे.
0 ते 1 वर्षाच्या मुलासाठी:-
या मुलांना गाय, म्हशीचे किंवा पॅकेट मधील दूध देऊ नये. यासाठी आईचे दूध उत्तम आहे. जर काही कारणास्तव आई आपल्या बाळास दूध देऊ शकत नसेल, तर आपण लहान मुलांना फॉर्म्युला दूध देऊ शकता. या मुलांना 0-6 महिन्यांपर्यंत दररोज ४०० मिली दूध द्यावे. त्याच वेळी, 6 महिन्यांपासून 1 वर्षाच्या मुलास दररोज एक ते दीड लिटर दूध द्यावे.
1 ते 2 वर्षांच्या मुलासाठी:-
या वयात मुलांच्या मेंदूचा विकास होतो. त्यामुळे या वेळी, मुलांना अधिक चरबीयुक्त आहार आवश्यक असतो, म्हणून या मुलांना संपूर्ण मलईचे दूध द्यावे.
बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर बाळाला थोड्या प्रमाणात गाईच्या दुधाची ओळख करून द्यावी. सुरुवातीला ते स्तनपानाचे दूध, फॉर्मुला दूध किंवा उकळून गार केलेल्या पाण्यासोबत द्यावे त्यामुळे बाळासाठी ते सोपे जाईल. बाळाच्या इतर अन्नपदार्थांमध्ये घालून तुम्ही ते देऊ शकता, असे केल्याने बाळाला ते पचते आहे किंवा नाही हे तुम्हाला समजेल.
तुम्ही गाईचे दूध स्तनपानाच्या दूध १:३ ह्या प्रमाणात एकत्र करू शकता. म्हणजे गाईच्या दुधाचा एक भाग आणि स्तनपानाच्या दुधाचे तीन भाग होय. तुम्ही हळूहळू गाईच्या दुधाचे प्रमाण वाढवू शकता आणि स्तनपानाच्या दुधाचे प्रमाण कमी करू शकता. नंतर, तुमच्या टॉडलरला तुम्ही फक्त गाईचे दूध देऊ शकता.
बाळाला अन्नपदार्थ भरवण्यापूर्वी तासभर आधी दूध द्यावे. त्यामुळे बाळास दुधापासून पोषणमूल्ये मिळतात आणि इतर अन्नपदार्थां साठी बाळाला भूक राहते.
कोणत्या काळापर्यंत स्तनपान करावे ?
नॅशनल हेल्थ सर्विसच्या वेबसाईटनुसार, आई आणि बाळ दोन्ही त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि इच्छेनुसार स्तनपानाचा आनंद घेऊ शकतात. WHO च्या अहवालानुसारही स्तनपान हे किमान सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत केले जाऊ शकते.
मुलांना पोषक आहार
रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅन्ड चाईल्ड हेल्थच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,स्तनपानातून दोन वर्षांनंतर मुलांना अधिक पोषणतत्व मिळतात याबाबत कोणतेही संशोधन नाही. दोन वर्षांनंतर मुलांच्या आहारात सार्याच पोषक घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे.
स्तनपानामुळे बाळ आणि आईमध्ये बॉन्डिंग वाढण्यासही मदत होते. मात्र अनेक महिला विशिष्ट टप्प्यानंतर पुन्हा त्यांच्या कामावर रुजू होतात त्यामुळे स्तनपान किती वर्ष चालू ठेवायचा हा सर्वस्वी आईचा निर्णय असू शकतो.