नगरपरिषद मुल कडून घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक ? लाभार्थ्यांच आरोप
घरकुलाच निधी तात्काळ देण्याची मागणी
प्रतिनिधी/मुल : मुल नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करून अनेक नागरिकांना घरकुलांचे बांधकाम चालू करण्याचे सांगण्यात आले त्यानुसार घरांचे बांधकाम चालू केले मात्र पावसाळ्याचे दिवस लागून सुद्धा घरकुलाचा निधी ना मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर नगर परिषदेने गरिबांची जणू फसवणूक केली ? असा आरोप सुद्धा लाभार्थी वर्गाकडून केल्या जात आहे. तरी सदर लाभार्थ्यांना तात्काळ निधी देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. व याची पूर्तता व्हावी या हेतूने माणूस नेहमीच धडपडत असतो व याची शासन स्तरावर दखल व्हावी या करिता शाषण, प्रशासन , लोकप्रतिनिधी सह नागरिक नेहमीच धडपडत असतो यात काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींना आशेवरच समाधान मानावे लागते. ही वास्तू स्थिती आहे.
नगर परिषद मुल मार्फत येथील नागरिकांना माहे फरवरी २०२० मध्ये पंतप्रधान आवास योजना ला मंजूर देण्यात आली व नागरिकांना जुने राहते घर पडून त्या जागी नवीन घरांचे तात्काळ बांधकाम करण्याचे सांगण्यात आले तशी परवानगी दिली. त्यानुसार अनेकांनी आपले जुनी कुडा मातीचे कौलारू घरे पाळून त्याजागी नवीन घराचे बांधकाम सुरू केले. त्याकरिता माहे एप्रिल मे 2020 व माहे अगस्त सप्टेंबर 2020 ला 40000+ 40000 असे एकूण 80000 हजार रुपयाचा दोन टप्यात निधी देण्यात आला. त्यात काहींनी लोन घेऊन तर काहींनी हातचे पैसे टाकून बांधकाम पूर्ण , अर्धवट केले परंतु निधी देण्यात आली नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने निवाऱ्याची मोठी समस्या अनुदान अभावी नागरिकांना सहन करावी लागत असून याबाबत अनेकदा सूचना करून सुध्दा काहीच उपाय योजना होत नसल्याने नगर परिषद मुल चे बाबत लाभार्थ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
तरी याकडे संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष देत थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावा अशी मागणी होत असून त्याबाबतीत निवेदन मुख्याधिकारी मुल यांना देण्यात आले आहे.
त्यावेळी अनिल कवडू गुरनुले,वैशाली कोपूलवार, रसुल शेख,अशोक वाळके,बालाजी गुरनुले,रूकमाबाई श्ेान्डे,ईश्वर मारोती गेडाम,मनोहर कारूजी शेरकी,नंदा येरणे,दिवाकर मोहूर्ले, श्रीधर आगडे, मीराताई मडावी,विठाबाई जेंगठे,वंदना ठाकरे,बाबूराव ठाकूर,सरस्वती कोल्हे,भाऊराव सुखदेवे, वैशाली मशाखेत्री आदी लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. तर तोडगा न निघाल्यास कठोर पाऊल उचलू अशा ईषारा देण्यात आलेला आहे.
Fraud of household beneficiaries