Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर २७, २०२१

"लसीकरण आपल्या दारी" : गरजू नागरिकांनी साधला मनपाशी संपर्क CMC Chandrapur Covacin

 चंद्रपुरात मनपातर्फे "लसीकरण आपल्या दारी" उपक्रमाचा शुभारंभ

- पहिल्या दिवशी सुमारे ४० नागरिकांनी घेतली लसीची मात्रा




चंद्रपूर, ता. २७ : संभाव्य कोरोना लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, वयोवृद्ध व अंथरुणास खिळलेले व्यक्ती यांच्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते सोमवारी (ता. २७)  "लसीकरण आपल्या दारी" उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

सकाळपासूनच अनेक नागरिकांनी भ्रमणध्वनी व ऑनलाईन अर्जाद्वारे लसीकरणासाठी संपर्क साधत उत्तम प्रतिसाद दिला. 'लसीकरण आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मित्रनगर, आंबेडकर कॉलेजजवळील रामनगर वॉर्डातील रहिवासी संजय डवरे आणि मंजुषा डवरे ही दिव्यांग भावंडे लसीकरणाची सर्वप्रथम लाभार्थी ठरली. त्यानंतर परिसरातील सुमारे ४० नागरिकांना लसीची मात्रा देण्यात आली.

तत्पूर्वी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात महापौरांनी लसीकरण वाहनास हिरवी झेंडी दिली. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, माजी महापौर अंजली घोटेकर, झोन २ च्या सभापती खुशबू चौधरी, नगरसवेक संजय कंचर्लावार, नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.  

२७ सप्टेंबरपासून सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीन फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत अंथरुणाला खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याकरिता प्रवृत्त करावे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकरण मोहिमेत सामील करून घ्यावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

इथे करा नोंदणी
आपल्या घरी अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी #💉 कोव्हीड लस द्यावयाची असल्यास https://bit.ly/3EIzp33 या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा. तसेच 9823004247 यावर संपर्क साधावा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.