Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१

चांपा ठरले १००% टक्के लसीकरण पूर्ण करणारे गाव

चांपा ठरले तालुक्यात १००% टक्के लसीकरण पूर्ण केलेले गाव

उमरेड तालुक्यातील चांपा गावातील १८ वयोगटावरील सर्व नागरिकांचे १००% टक्के लसीकरण पूर्ण करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथम लसीकरण  युक्त गाव ठरले असल्याचे पाचगाव प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांनी यावेळी सांगितले. #champa #nagpur #umred #covishild #covid

जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे,  मात्र ग्रामीण भागात वेगवेगळे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाल्याने लोक "सहज लसीकरणासाठी तयार होत नाही त्यात विशेष म्हणजे पारधी समाज. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत सरपंच कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. अशीच स्थिती उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत होती. मात्र सरपंच अतिश पवार यांनी पारधी समाजाचे सोबतच  गावातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास समुपदेशन करून गावात लसीकरण संदर्भात जनजागृती केली. यात आदिवासी पारधी समाजातील समशेर नगर वस्तीत १००%टक्के पारधी बांधवांचे लसीकरण पूर्ण करून जिल्ह्यात चांपा ग्रामपंचायतीने सर्वांसमोर एक नवा आदर्श घडविला आहे.


कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीरचे आयोजन

चांपा ग्रामपंचायतीच्या सभागृहात सोमवारी ता २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. गट ग्रामपंचायत चांपा येथे लसीकरण मुक्त गाव मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतीच्या सभागृहात कार्यक्रमात सरपंच अतिश पवार, पालक अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे,चांपा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी बी वैद्य यांनी कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करून १८ वयोगटावरील २०१, २२६,३४६ लोकांचे पहिला व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

कोव्हीड १९ लसीकरण १०० टक्के पूर्ण करून कोव्हीड १९ वैश्विक महामारीला देशातून हद्दपार करण्यात चांपा गावाने मोलाचे कार्य केल्याबद्दल सरपंच अतिश पवार यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रसुरेश डोंगरवार यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मुक्त गावाचे प्रमाणपत्र देऊन चांपा गट ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले.यावेळी प्रामुख्याने उपस्थित तलाठी प्रवीण मेश्राम,कृषी सहाय्यक अधिकारी शिल्पा सुके सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी ग्रामस्थ होते.

चांपा गट गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागातील सुकळी,समशेरनगर या पारधी समाजाच्या वस्तीत सरपंच अतिश पवार यांच्या पुढाकारातून १००% टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. १८ वयोगटातील सर्व व्यक्तींना पहिला डोस अर्थात कोरोनाची लस देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे  या गावात एकही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोरोनामुक्त असलेले हे गाव आता लसीकरण युक्त गाव ठरले आहे,गावातील सर्व पात्र लाभार्थींना सिरम कंपनी निर्मित कोवीशिल्ड लस देण्यात आली.

चांपा १००%पहिला डोस मिळालेले तालुक्यात प्रथम गाव ठरले आहे.सुकळी, समशेरनगर हे गाव पूर्णतः दुर्गम असून येथे आदिवासी गोंड व पारधी समाज मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत  ग्रामपंचायत व तालुका ,जिल्हा आरोग्य विभागाकडून कोविड मुक्त लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गावात टोचाल तर वाचाल विशेष अभियान राबवून सर्वाना लसीचा पहिला,दुसरा डोस देऊन १००% लसीकरण पूर्ण करण्यात आले.

चांपा येथे सात टप्प्यात लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले यात पहिला व दुसरा लसीचा डोस  देऊन १००%ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यात गावातील नागरिकांनी पाचगाव आरोग्य केंद्रात जाऊन १७ मार्च ते २७ सप्टेंबर पर्यंतचे एकूण १९७ च्या वर नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला. त्यानंतर चांपा गावात ६५ वयोगटावरील नागरिकांचे पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरण शिबीरात १२७, तर ३० ते ४४ वयोगटावरील दुसऱ्या टप्यातील लसीकरण शिबीरात १२९, तर तिसऱ्या टप्प्यात १८ वयोगटावरील २२६, चौथ्या टप्प्यात २०१, पाचव्या टप्प्यात ७२, सहाव्या टप्प्यात २६६ आणि सातव्या टप्प्यात ८० नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लसीचा पहिला, व दुसरा डोस टोचून घेतला चांपा येथील १०५८ लोकसंख्या पैकी गंभीर आजार,बाळाची आई,स्थलांतरित, व मृत्यू झालेले नागरिक, असे एकंदरीत पन्नासच्यावर नागरिकांना वगळुन १८ वयोगटावरील एकूण १०५८ लोकसंख्यापैकी ६३५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेऊन चांपा ग्रामपंचायतीचे १००% टक्के लसीकरण पूर्ण करून घेतले आहेत.

चांपा गावाला लसीकरण मुक्त गाव बनविण्यासाठी सरपंच अतिश पवार, पाचगाव आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रसूरेश डोंगरवार, चांपा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश रावते, पालक अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे,ग्रामसेवक बी बी वैद्य, उपसरपंच अर्चना सिरसाम,यांनी अथक प्रयत्न  करून गावाला लसीकरण मुक्त गाव केले.

गावातील १८ वयोगटावरील सर्व नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता आपले व कुटुंबंयांचे,गावाचे १००% टक्के लसीकरण करून घेतल्याबद्दल सरपंच अतिश पवार यांनी सर्व चांपावासियांचे आभार मानले.

चांपा गाव हे रोडवर रहदारी असलेले गाव आहे. या ठिकाणी अनेक व्यापारी आहेत, शाळा, कॉलेज आहेत, मजूर व नागरिकांचे नेहमी स्थालांतरण होत राहते, गावात आठवडी बाजार भरते त्यामुळे या सर्वांचा कोविड प्रबिधंक कोविड-१९ लसीकरण होणे गरजेचे होते यात सुपर स्प्रेडर लोकांचे लसीकरण करुण चांपा गाव आज कोविड-१९ लसिकरण मुक्त गाव करण्यात आले ही अतिशय आनंदाची बाब आहे.कोरोना लसीकरण मुक्त गाव झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गट ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे. प्रत्येक गाव लसिकरण झाले तर भारतातून कोविड १९ महामारी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. चांपा गावाने कोविड १९ लसिकरण १००% करून कोविड-१९ महामारीला हद्दपार करण्यास सुरवात केली आहे व सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांपा गावाने सर्वांसमोर एक आदर्श घडवीला  आहे. यासाठी सरपंच अतिश पवार व चांपा येथील ग्रामस्थांना शुभेच्छा.

 डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार पाचगाव आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी



 #champa #nagpur #umred #covishild #covid 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.