व्यवसाय मार्गदर्शन, महाकारिअर पोर्टल ऑनलाईन कार्यशाळा संपन्न
डायट गोंदिया व गट साधन केंद्र अर्जुनी मोर चे आयोजन
संजीव बडोले प्रतिनिधी .
नवेगावबांध ता.22सप्टेंबर:-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( व्हिजीपीजी विभाग )गोंदिया व गट साधन केंद्र अर्जुनी मोर द्वारा विद्यार्थी व शिक्षकांसाठी दि.२१ सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी १२.००ते १.०० वाजे दरम्यान व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन व महाकारिअर पोर्टल ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत सम्राट अशोक विद्यालय उमरी सावरटोला व स्व. कवळू पाटील लांजेवार हायस्कूल भिवखिडकी येथील वर्ग ८ ते १० चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. राजेश रुद्रकार प्राचार्य ,डायट गोंदिया यांच्या प्रेरणेतून आयोजित या ऑनलाईन कार्यशाळेच्याअध्यक्षस्थानी घनश्याम गहाणे मुख्याध्यापक स्व. कवळूजी पाटील लांजेवार हायस्कुल भीवखिडकी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून, आर.एल. मांढरे गट शिक्षणाधिकारी पंचायात समिती अर्जुनीमोर,सूर्यभान टेंभुर्णे सम्राट अशोक विद्यालय उमरी उपस्थित होते.या ऑनलाईन कार्यशाळेला योगेश्वरी नाडे अधिव्याख्याता व व्हिजीपीजी विभाग प्रमुख डायट गोंदिया,मिलिंद रंगारी ,जिल्हा समुपदेशक,डायट गोंदिया यांनी मार्गदर्शन केले.या ऑनलाईन कार्यशाळेत करिअर मार्गदर्शन, महाकारिअर पोर्टल माहिती, कोविड -19 काळातील व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी प्रश्नोत्तराच्या तासा नंतर कार्यशाळेची सांगता झाली.प्रास्ताविक सत्यवान शहारे गटसमन्व्यक व व्हिजीपीजी तालुका विभाग प्रमुख यांनी केले.आनलाईन कार्यशाळेचे संचालन व उपस्थितांचे आभार कु.उर्मिला पडोळे विषय साधनव्यक्ती यांनी मानले. सदर कार्यशाळेला सर्व साधनव्यक्ती दोन्ही शाळेतील शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.