सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणी होणार आहे. सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण साधन व्यक्ती, विशेष फिरते शिक्षक यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे . या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे . याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तेतील विद्यार्थ्यांची सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी पूर्व चाचणीद्वारे जुलै २०२१ मध्ये माहिती संकलन करण्यात आले आहे . त्यानुसार या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची स्थिती तपासणे आवश्यक आहे . यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून उत्तर चाचणी देण्यात येत आहे.
यासाठी संबंधितांनी वैयक्तिकरित्या यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते , त्याच विद्यार्थ्यांचे उत्तर चाचणीसंदर्भातील सर्वेक्षण दि .१५ / ० ९ / २०२१ पर्यंत
या लिंकद्वारे पूर्ण करावे.
कोणत्याही परिस्थितीत इतर विद्यार्थ्याची माहिती लिंक वर भरून घेऊ नये. यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत..
विद्यार्थी सर्वेक्षणाची उपरोक्त लिंक कोणत्याही शिक्षकांना अथवा मुख्याध्यापकांना फॉरवर्ड करण्यात येऊ नये, असे आवाहन प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी केले आहे.
There will be a survey of students' answer tests