अमरावती जिल्हयात रेती चोरांचा सुळसुळाट
९१ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्रमांक १ नागपूर शहर यांचे आदेशानुसार वाडी पोलिसांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग येथील व्याहाड ( पेठ ) येथे सापळा रचून तीन ट्रक मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले. प्राप्त पोलीस माहितीच्या सुत्रानुसार ट्रक क्रमांक एम. एच. २७ बी. एक्स.९७९९ चा चालक आरोपी अमन कलंदर शाह वय ३८ वर्ष रा. हैदरपुरा कोल्हापुरी गेट, अमरावती, ट्रक क्रमांक एम. एच. बी. एक्स ६६९९ चा चालक कलिम निसार खान वय ४६ वर्ष रा. पठाणपुरा चौक नागपुरी गेट ,अमरावती. क्लिनर शेख सदद्दाम मोहम्मद वय ३८ रा. वलगांव रोड कामुजा अमरावती,ट्रक क्रमांक एम. एच.३० ए. व्ही.६६९९ चालक शेख सोहेल शेख हमीद वय २६ वर्ष रा. पठाण चौक नागपुरी गेट अमरावती, क्लिनर अविनाश राजेंद्र शिरभाते वय २३ वर्ष रा.कुऱ्हा ता. तिवसा जिल्हा अमरावती व ट्रकचा मालक सोहेब खान इजाज खान वय २० वर्ष रा.वलगांव अमरावती,शेख इमरान खान नौशाद वय ३८ वर्ष रा.मोझरी गुरुकुंज अमरावती यांच्या सांगण्यावरून आरोपींनी सावनेर जिल्हा नागपूर येथून रेतीची चोरी करून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता शासनाचे संमतीशिवाय विनापरवाना चोरून वाहतूक केल्याची कबुली दिली असता पोलिसांनी तिन्ही ट्रक वजन काट्यावर नेऊन त्याचे वजन करून आरोपींना मुद्धेमालासह पोलीस स्टेशन हिंगणा यांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ १ सहा पोलीस आयुक्त एमआयडीसी नागपूर शहर याचे मार्गदर्शनात दुय्यम पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे,पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस कॉन्सटेबल सुनील मस्के,प्रदीप ढोके,प्रवीण फलके सतीश येसकर आदींनी बजावली पुढील तपास हिंगणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कुथे करीत आहे.