महामारीच्या प्रकोपात सुदृढ समाजीक स्वास्थ टिकविण्यात कोरोना योद्धांचे प्रशंसनीय सहकार्य : खासदार बाळू धानोरकर
⭕️ कोरोना काळात मानवीय करूणा, दया आणि सहानुभूती या गुणांचे क्षणोक्षणी दर्शन
ताई फाउंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या वतीने कोरोना योद्धांचा आभार -सत्कार
चंद्रपूर : मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण जग सर्व प्राथमिक उलाढाली बाजूला ठेऊन कोरोना महामारीच्या युद्धाशी लढतंय.कोरोणाचे संकट देशावर असताना या काळात ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून यापुढेही सरपंच संघटनेने असे विधायक काम करावे असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.दिनांक 16 ऑगस्ट ला ताई फॉउंडेशन चे संस्थापक सचिव तथा ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे मार्गदर्शक ऍड. देवा पाचभाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
ताई फाउंडेशन व ग्रामसभा सरपंच संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार बाळू धानोरकर,उद्घाटक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,प्रमुख अतिथी माजी जि. प.सदस्य आशिष खुडसंगे, ताई फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष गोमती ताई पाचभाई , ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर, जिल्हा सचिव मंजुषाताई येरगुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील 40 सरपंच तथा 30 सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विशेष कार्य करणाऱ्या मनपा चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडारे, डॉ प्रणाली डांगेवार व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगे वार व शहरातील नामवंत अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांचा सत्कार करण्यात येऊन कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सामाजिक आभार माणण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की ग्रामीण भागात सरपंच आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचे कार्य कोरोणा काळात समाज उपयोगी ठरले,यात अनेकांचे प्राण वाचले देशावर जीवघेणे संकट असताना एक नागरिक म्हणून पार पाडलेली ही जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून यापुढेही सामाजिक कार्यकर्त्यांनी तथा नागरिकांनी हे संकट दूर करण्यासाठी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
प्रशासनाला समाजातील या योद्धानीं प्रादुर्भाव कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावण्यास स्वयंत्स्फूर्त मदत केली.विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगत सतर्क राहणे आवश्यक आहे. एकमेकांना सहकार्य करीत पुढे जावे, असे मत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी व्यक्त केले.
आयोजक मनोगत व्यक्त करताना ताई फॉउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा गोमतीताई पाचभाई यांनी सामाजिक आभार व्यक्त करत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.या कठीण काळात मानवीय समाजाने करूणा, दया आणि सहानुभूती हे गुण आपल्या अंगी टिकून आहेत याचे क्षणोक्षणी दर्शन कोरोना संसर्गाच्या काळात अनेकजनाणी एकमेकांच्या मदतीसाठी धावून येत घडविले . किंबहुना इतरांची मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्यच आहे व त्या कर्तव्यदक्ष स्वयंसेवकांचे सामाजिक ऋण फेडन्याकरीता आम्ही हा आभार सत्कार करत त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
या आभार-सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सह आयोजक ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सचिव निलेश पुलगमकर यांनी तर सूत्र संचालन रत्नाकर चटप यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामसभा सरपंच संघटनेचेमार्गदर्शक ऍड.देवा पाचभाई,ताई फाऊंडेशनच्या संगीता ठेंगणे,शितल देवगडे,भावना फुलोरी, रंजना देवगडे,प्रेरणा यदनूरवार,कृष्णा चंदावार व ग्रामसंवाद सरपंच संघटना चंद्रपूर-यवतमाळ चे सदस्य निखिल चामरे, प्रशांत कोपल्ला यांच्या सहीत अनेक सदस्यांनी आदींनी परिश्रम घेत सुनियोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील अनेक सरपंच, आशा वर्कर तथा नागरिकांची मोठी उपस्थिती होती.