नागपूर शिक्षक मतदार संघासाठी
सुधाकर अडबाले यांची मोर्चेबांधणी
Nagpur – Vidarbha Madhyamik Shikshak Sangh ... -
चंद्रपूर- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा दिलेला आहे. प्रसंगी सभागृहात आवाज उठवून शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठविला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघामुळेच शिक्षकांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळाले आहे. भविष्यातील शिक्षण क्षेत्रात येणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकानी सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांना सभागृहात पाठवावे व अस्तित्वासाठी संघटनेचे हात मजबूत करावे असे आवाहन माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांनी आज दिनांक 1ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक (Vidarbha Madhyamik Shikshak Sangh ) संघाच्यावतीने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेत माजी आमदार डायगव्हाणे बोलत होते. संभाव्य डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने सुधाकर अडबाले उमेदवार जाहीर केलेला आहे. सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या नागपूर मतदार क्षेत्रात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. या मोहिमेची सुरुवात चंद्रपूर येथे करण्यात आली. यावेळी माजी आमदार डायगव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून नागपूर शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले होते. प्रमुख उपस्थितीत गजानन गावंडे ,जगदीश जूनघरी, लक्ष्मणराव धोबे ,विजय टोंगे, केशव ठाकरे, भाऊराव राऊत, हरिभाऊ पाथोडे ,मारोती अतकारे , मदनराव ठेंगणे, श्रीहरी शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संभाव्य डिसेंबर 2022 मध्ये होणाऱ्या नागपूर शिक्षक मतदार संघा करिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने उमेदवार जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सुधाकर अडबाले यांच्या प्रचारार्थ जिल्हा पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे.

त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे मातोश्री सभागृहात सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी वरिष्ठ नेत्यानी विदर्भ माध्यमिक संघाने तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या उमेदवारांना विजयी करण्याची रणनीती आखली. यावेळी माझी आणि जुन्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आव्हान केले प्रत्येक तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी ही लढाई अस्तित्वाची समजून लढावी असे आवाहन केले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले यानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने केलेल्या योगदानाचा आढावा घेतला आणि भविष्यातही शिक्षकांच्या हक्कासाठी सदैव पाठीशी राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले आभार जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी मानले . सहविचार सभेला जिल्हा पदाधिकारी व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.