Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २९, २०२१

उद्योगातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी 'लघुउद्योगभारती'ची मदत घ्या

उद्योगात उत्पादनाचा दर्जा आणि पुरवठा साखळी कायम ठेवणे आवश्यक

ग्रामायण उद्यमगाथा मध्ये शशिभूषण वैद्य 


नागपूर : उद्योगात उत्पादनाचा दर्जा आणि पुरवठा साखळी कायम ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वर्धा येथील  'समर्थ उद्योग' आणि 'समर्थ उद्यम' चे संचालक शशिभूषण वैद्य यांनी ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या 'उद्यम गाथा' कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय मंजूषा रागीट यांनी केले. शशिभूषण हे वर्धा ऍग्रो प्रोसेसिंगचे कार्यकारी संचालक व लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शशिभूषण वैद्य यांची मुलाखत राजेन्द्र काळे यांनी घेतली.


वैद्य यांच्या 'समर्थ उद्योग'मध्ये ऑफिस फाईल्स, फोल्डरचे तर 'समर्थ उद्यम'मध्ये आवळ्याचे पदार्थ - सरबत, कँडी, सुपारी या शिवाय इन्स्टंट भेळचे उत्पादन होते. खाद्य पदार्थांचा उद्योग प्रस्थापित करण्यात वर्धा येथील केळकर उद्योगाचे अरुण केळकर याची मोठी मदत झाली, असे ते म्हणालेत.  


उद्योगात 'ब्रॅण्ड' प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादन विकसित करण्यात आणि ते बाजारात प्रस्थापित करण्यासाठी खूप मेहनत आणि संयमाची गरज आहे. पण, एकदा उत्पादन ग्राहकांच्या पसंतीला उतरले की नंतर मार्ग सुकर होतो. नंतर पुरवठा साखळी नियमित ठेवणे आवश्यक आहे, असे वैद्य म्हणालेत. 

'लघुभारती'ची मदत घ्या        

उद्योगातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी किंवा उद्योग विकसित करण्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी 'लघुउद्योगभारती'ची मदत घ्या. यासाठी lubindia.com या वेबसाईटवर किंवा नागपूर येथे फोन क्रमांक - २५५०८२६ तसेच मोबाईल क्रमांक ८६९८७ ६०६८५ व ९९२३७ ९५८३३ वर संपर्क करा, असे आवाहन शशिभूषण वैद्य यांनी केले. आभारप्रदर्शन राजेंद्र काळे यांनी केले.  


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.