Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

शेतकरीबांधवांनो कीटकनाशके फवारणी करताना घ्या अशी काळजी

शेतकरीबांधवांनो कीटकनाशके फवारणी करताना घ्या अशी काळजी

जनजागृती मोहीम रथाचा शुभारंभ
कृषी विभागाचा उपक्रम




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२४ ऑगस्ट:-
महाराष्ट्र शासन कृषी विभाग गोंदिया व जीएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशके फवारणी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी जनजागृती मोहिमेची सुरुवात दि.२३ ऑगस्ट रोज सोमवार ला नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहरे यांच्या शुभहस्ते रथाचे विधिवत पूजन करून करण्यात आले.
या प्रसंगी स्थानीय उपसरपंच रघुनाथ लांजेवार अध्यक्षस्थानी होते .याप्रसंगी नवेगावबांध कृषी मंडळअधिकारी कुमुदिनी बोरकर, पर्यवेक्षक राजू संग्रामे ,कृषी पर्यवेक्षक प्रकाश मेश्राम, कृषी सहाय्यक योगेश मोहतुरे भिवखिडकी , मोतीलाल येळणे प्रतापगड ,सागर होलगिरे केशोरी , विकास मदने गोठणगाव, कामिनी गायकवाड चान्ना/बाकी , लोकेश चांदेवार नवेगाव /बांध ,भोजराज नखाते देवलगाव, मिलिंद मोरे पवनी/ धाबे , प्रकाश वासनिक शिरेगाव/ बांध आदी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगी कीटकनाशक फवारणी करतांनी तथा वापर करताना घ्यावयाची काळजी उपस्थित शेतकऱ्यांना फिरत्या रथाच्या द्वारे जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी नवेगावबांधचे कृषी मित्र बाळू डोंगरवार, हुसेन नंदागवळी, हना टेम्भूर्णे, मदन मेश्राम ,अभिमन कापगते ,प्रयोगशील शेतकरी सतिश कोसरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .सदर जनजागृती रथ चान्ना/कोडका, देवलगाव ,कुंभीटोला, बाराभाटी ,कवठा, खैरी ,सुकडी, अर्जुनी-मोर ,ताडगाव ,झरपडा, करडगाव ,अरत्तोंडी ,निमगाव, दाभना, बोंडगाव /देवी आदी गावांमध्ये फिरून शेतकऱ्यांना औषध फवारणी करतांनी घेण्याच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.