Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान.

औरंगाबाद - दैनिक लोकरत्न च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्याने सामाजिक क्षेत्रातील कार्य करनाऱ्या व्यक्तीच्या कार्याची व्यक्तींना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करन्यात आले.यात उत्कृष्ट समाजरत्न या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांना उत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार उपस्थित मान्यवर सुरेश भाले साय्यक पोलीस निरीक्षक औरंगाबाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती जावेद खान यानीं सांगितले कि पुरस्काराने उर्जा निर्माण होते व काम करन्यात गती वाढते कौतचकाची थाप म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करुनच पुरस्काराने सन्मानित केले आहे.समाजसेवक सुमित पंडित यांनी समाजासाठी वाहुन घेतले आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.यांचे समाजउपयोगी विविध ४१ उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेत आदर्श ठरले आहे. त्याच्यासाठी हा पुरस्कार काहिच नाही.असे संपादक यांनी कार्यक्रमात बोलतांना म्हटले.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ व सन्मानचिन्ह वृक्ष देऊन सुमित व त्याची अर्धांगिनी सौ. पुजा पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आहे.पुरस्कारामुळे समाजात सुमित पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित चा हा ८२ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना विविध ८१ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार सोहळा दि.२३ /०८/२०२१  रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सांय ०७:०० वा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमात लोकरत्न चे मुख्य संपादक जावेद खान व लोकरत्न च्या सर्व प्रतीनीधी यांनी परिश्रम घेतले व सुर्यकांत मोटे यांनी कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन केले.या पुरस्कार सोहळ्यासाठी विविध मान्यवरान सह व्यंकटेश केद्रे साहेब पोलीस निरीक्षक जिन्सि पोलीस स्टेशन,सुरेश भाले साय्यक पोलीस निरीक्षक औरंगाबाद,अब्दुल कय्युम,अनिस रामपुरे,सुनिल वैद्य,लक्ष्मी पंडित, राम पंडित व विविध मन्यवर उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.