शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
:भांडे धुण्याच्या बेसिन च्या जाळी मधे साप अडकल्याची सूचना इको-प्रो च्या सदस्यांना मिळाली. सूचना मिळताच घटनास्तळी पोहचून सापाची व सोबतच घरमालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
विवेकानंद महाविद्ध्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमी प्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागत असतांना वॉश बेसिन मधे ठेवलेले भांडे घायला गेले असता त्या वॉश बेसिन च्या जाळी मधे एक साप अडकलेला दिसला हे दृश्य बघताच त्यांची भांबेरी उडाली. त्यांनी हा प्रकार आपल्या पती ला सांगितला त्यांनी त्या सापाला पडविण्याचा प्रयत्न केला परंतु तो साप जाळीत अडकला असला मुळे त्याला निघता येत नवते. रुयारकर यांनी आपल्या घरी साप असल्याची माहिती इको-प्रो चे सदस्य दीपक कवठे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्या जाळीतून सापाला काढण्याचे प्रयत्न केले. परंतु साप निघू शकला नाही. त्यांनी मग आपले सहकारी अमोल दौलतकर, शुभम मेश्राम यांना माहिती दिली व लोखंडी पत्रा कापण्याचे कटर आणायला सांगितले. त्यांचे सहकारी घटनास्तळी पोहचले व अथक प्रयत्नाने ते जाळी कापून सापाला मुक्त केले. घरात साप निघाल्या मुळे घाबरलेल्या रुयारकर कुटुंबाला धीर देत या सर्पमित्रांनी त्या सापास सुखरूप सोडून दिले. व रुयारकर कुटुंबानी इकोप्रो च्या सदस्ययाचे आभार मानले.