महापौरानी घेतली दिव्यांग भावंडाची सदिच्छा भेट
मनपातर्फे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सानुग्राह मदत
चंद्रपूर, ता. १५ : शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांकरिता दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दिव्यांगांकरिता निधीची तरतूद करण्यात आली होती. महापौर राखी संजय कंचर्लावार ( Chandrapur CMC Mayor Rakhi Sanjay Kancharlawar)यांनी स्वतः दिव्यांग भावडांच्या घरी सदिच्छा भेट दिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी रामनगर प्रभागातील मित्रनगर येथील संजय डवरे व मंजुषा डवरे या दोन भावंडांना सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र देऊन "दिव्यांगांचा मान; महापौरांनी केला सन्मान" या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या दिव्यांग नागरिकांना मनपातर्फे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सानुग्रह निधी देण्यात येत आहे. एकूण १२५७ लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये एकूण २ कोटी ८५ लाख ६८ हजार ६०८ रुपयाचा निधी आरटीजीएसद्वारे अदा केला आहे. यानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार ( Chandrapur CMC Mayor Rakhi Sanjay Kancharlawar) स्वतः टप्याटप्याने सर्व दिव्यांगांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत. याच अनुषंगाने "दिव्यांगांचा मान; महापौरांनी केला सन्मान" या उपक्रमाचा शुभारंभ प्रमाणपत्र देऊन रविवारी करण्यात आला. रामनगर प्रभागातील मित्रनगर येथील आंबेडकर कॉलेजजवळ आकाशवाणी केंद्र मार्गावर डवरे यांचे घर आहे. आज चाळीशी ओलांडलेले दोघेही भावंडं जन्मतः दिव्यांग असून, स्वतःहुन कोणत्याही शारीरिक हालचाली करू शकत नाही. त्यांचे वृद्ध आई-वडील त्यांचा उदरनिर्वाह आणि देखरेख करीत असतात. १०० टक्के दिव्यांग असलेल्या संजय डवरे व मंजुषा डवरे या दोन भावंडांना सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन सभापती छबू वैरागडे, नगरसेविका शीतल आत्राम यांची उपस्थिती होती.
Chandrapur CMC Mayor Rakhi Sanjay Kancharlawar