सीबीएसई बारावीनंतर आता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. हा निकाल ३१ जुलैला जाहीर होण्याची शक्यता होती. पण आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी बोर्डाकडून सर्व तयारी झाली असून विद्यार्थ्यांना रोल नंबर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती ते अधिकृत वेबसाइट आण cbseresults.nic.in वर निकाल पाहू शकता.
CBSE 10th Roll Number: असा करा डाऊनलोड
- स्टेप १ – सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा
- स्टेप २- होमपेजवर स्क्रोल करा ‘Roll Number Finder 2021’ लिंकवर क्लिक करा
- स्टेप ३ – सर्व ऑप्शन सिलेक्ट करा पुढच्या पेजसाठी ‘Continue’ वर क्लिक करा
- स्टेप ४ – दहावीचा पर्याय निवडा आणि मागितलेली माहिती भरा. आपले नाव, आई-वडिलांचे नाव, जन्म तारीख अपडेट करा
- स्टेप ५- स्क्रीनवर सर्च डेटावर क्लिक केल्यावर रोल नंबर समोर येईल
- स्टेप ६ – डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट काढून ठेवा