Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

भरपूर कॅल्शियम असणारे पदार्थ कोणते? | calcium | Health

शरीरामध्ये कॅल्शियमची जरूरी हाडांसाठी व दातांसाठी फार आवश्यक आहे शरीरातील पाचक द्रव्य सक्रिय राहण्यासाठी कॅल्शियमची खूप जरूर आहे कॅल्शियम मुळे रक्तस्राव तसेच शरीरावर येणारी सूज यांना प्रतिबंध घातला जातो कॅल्शियम calcium | Health अभावी हाडे ठिसूळ होतात रक्ताभिसरणाची क्रिया मंदावते रक्त गोठण्याची क्षमता घटते त्यामुळे कॅल्शियम शरीराला फार आवश्यक आहे


दुध, मेथी , शेवग्याच्या शेंगा तसेच हिरव्या पालेभाज्या ,बीट ,अंजीर बदाम ,द्राक्षे , कलिंगड, सुकामेवा, बाजरी, तीळ ,उडीद या सर्व प्रकारातुन calcium मिळू शकते. धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात. थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही. 


दूध - दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.


दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम मिळते. calcium | Health


मसाले-तुळस - ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून कॅल्शिअम मिळते.


पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या - शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते


संत्री-लिंबू - संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.


 सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.


गूळ - गुळामध्ये भरपूर प्रमाणत कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो. calcium | Health





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.