औरंगाबाद - राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी, हतनूर (ता.कन्नड) येथे आज ग्रंथपाल दिवस कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रवीण अकोलकर होते, त्यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल दिपक भगुरे यांनी केले तर, प्रा. मनोज गरड यांनी आभार मानले.
डॉ. रंगनाथन यांचा जन्म दिवस हा भारतात ग्रंथपाल दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. डॉ. रंगनाथन यांचे आधुनिक भारतातील ग्रंथालयाच्या विकासात फार मोठा वाटा आहे. त्यांनी सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाड खुली करून दिली. त्यांनी मांडलेले पाच सिद्धांत ग्रंथालयशास्त्रचा पाया समजले जातात.
कार्यक्रमासाठी प्रा. श्रीमती हेमांगी सोनवणे, प्रा. श्रीमती. हर्षदा निकम, श्रीमती. प्रियांका लांडे, श्री. किरण शिंदे, जितेंद्र कलांसे, विजय कटके, गणेश कुल्हाळ, रवींद्र गायकवाड, दिलीप गायकवाड उपस्थित होते.