Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

रेल्व गाड्या बंद; प्रवाशांची होरपळ : सेवाग्राम लिंक एक्सप्रेस व अन्य रेल्वेगाड्या त्वरीत सुरु करा

 




हंसराज अहीर यांची केंद्रीय रेल्वे मंत्री  यांचे सोबत चर्चा


हावडाकरीता थेट रेल्वे नसल्याने चेन्नई-विलासपूर एक्सप्रेस हावडा  पर्यंत चालविण्याची केली मागणी


चंद्रपूर:- कोरोना काळात बंद करण्यात आलेली बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस पूर्ववत सुरु करावी, बंगाली बांधवांकरीता हावडासाठी चंद्रपूर येथून थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने चेन्नई-बिलासपूर तसेच वैनगंगा एक्सप्रेस या गाड्यांचा विस्तार करुन हावडा पर्यंत चालविण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील  रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अन्य महत्वपूर्ण रेल्वे गाड्या पूर्ववत सुरु कराव्यात या करीता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय रेल्वे मंत्राी अश्वीनी वैष्णव यांची भेट घेवून त्यांचेसोबत रेल्वविषयक मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी वर्धेचे खा. रामदास तडस उपस्थित होते.

कोरोना संकटामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा सुविधेकरीता सुरु असलेल्या महत्वपूर्ण रेल्व गाड्या बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची प्रचंड होरपळ होत आहे. व्यावसायिक व्यापारीदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील प्रवाशांना यामुळे प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो आहे. यासाठी चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीचा सतत पाठपुरावा व प्रवाशांची मागणी लक्षात घेवून  हंसराज अहीर यांनी प्रवाशांच्या अडचणींची जाणीव मा. रेल्व मंत्री  यांना प्रत्यक्ष भेटीत करुन दिली व कोरोना काळात बंद केलेल्या या रेल्वेगाड्या त्वरीत सुरु करुन जिल्ह्यातील प्रवाशांना न्याय  द्यावा अशी मागणी केली.

या भेटीत हंसराज अहीर यांनी बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे त्वरीत पूर्ववत सुरु करावी, नंदीग्राम एक्सप्रेस जी आदिलाबाद पर्यंत सुरु आहे ती बल्हारशापर्यंत वाढविण्यात यावी, बंगाली भाषीक बांधवांसाठी चंद्रपूर येथून चेन्नई-बिलासपूर किंवा वैनगंगा एक्सप्रेस हावडा पर्यंत चालविण्यात यावी, पूणे-काजिपेठ एक्सप्रेस ही सप्ताहातून 3 दिवस सुरु करावी, तसेच कोरोना काळात बंद केलेल्या आनंदवन व ताडोबा एक्सप्रेस पूर्ववत सुरु करुन सप्ताहातून 3 दिवस सुरु करावी, बल्हारशाह-वर्धा पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरु करावी यासह रेल्वेशी संबंधित अन्य मागण्या रेल्वे मंत्र्यांना  करण्यात आल्या.

या भेटीत रेल्वेशी संबंधित अन्य प्रश्नांवर मंत्री  महोदयांशी सविस्तर चर्चा केली. याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्री  महोदयांनी मागण्यांबाबत अनुकुतलता दर्शविली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.