औरंगाबाद - माणुसकीहीन झालेल्या समाजातील लोकांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पैसे देऊन ठेवले आहे.तर काहींनी दोन वेळेचे जेवन मिळते म्हणून शासकीय रुग्णालयात आणुन सोडले आहे. बेवारस अवस्थेत औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलाच्या खाली सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या जवळ शासकीय रुग्णालय परिसरात बरेचसे आई-वडील दोन वेळचे जेवण मिळतं म्हणून तिथे आपला उदरनिर्वाह भागवीत आहे. एवढेच नाही तर आपल्या मुलांपर्यंत ही गोष्ट कळु नये म्हणून ते आपल्या मुलांचे विचारणा केली असता नाव सुद्धा सांगत नाही. पण माणुसकी हीन झालेल्या मुलांनी थोडीशी माणुसकी दाखवून आपल्या आई-वडिलांना घरी आणण्याची गरज आहे. जेणेकरून वृद्धाश्रम तरी रिकामे होतील. आणि खऱ्या गरजवंतांना तिथे जागा मिळेल. आजच एक जीवंत उदाहरण म्हणजे समाजसेवक सुमित पंडित हे रुग्णालयात रुग्णांना मदत करत असतांना एका ७५ वर्षीय आजोबा हे मनपा जवळ लोकांना मदत मांगत होते. सुमित पंडित यांनी त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले मोठं दुखः सांगितले की पोलीसांकडे घेवुन चला असे आजोबांनी सांगीतल्यावर पंडित यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे नेले. पोलीसांनी विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव रामजी तुकाराम गवळी रा.लोहगाव ता.कन्नड जि.औरंगाबाद त्यांनी मुलांकडे राहण्यास नकार दिला कारण गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ते मिळेल तीथे खातो व कुठेही झोपतो मुले सांभाळ करत नाही. व दारु पिवुन मला मारहाण करतात घाटी रुग्णालयाच्या आवारात मी काही दिवसापासून राहतो कारन तीथे दोन वेळेचे जेवन मिळते व शेड मध्ये राहण्याची देखील व्यवस्था आहे. मी माझ्या पोटाच्या मुलांना लहानाचे मोठे केले. आणि मला तीन मुले पत्नी असुन सुध्दा हि वेळ माझ्यावर पोटाच्या मुलांनी आणली मी पीशोर पोलीस स्टेशन मध्ये मुलांच्या विरोधात सांभाळत नाही म्हणून बऱ्याच वेळेस गुन्हा नोंद केला आहे. मला कुठेतरी वृध्दाआश्रमात घेवुन चला म्हणून सुमित पंडित यांनी सदर वृद्ध आजोबा रामजी गवळी यांनी होकार दिल्यानंतर सुमित पंडित हे त्यांना चिंचपुर ता.सिल्लोड येथील वेनुताई वृध्दाश्रमातील साहेबराव दनके यांच्याशी संपर्क करुन आजोबाला तीथे अन्न वस्त्र निवारा यासाठी त्यांना एस टि बसने वृध्दाश्रमात नेले. आजच्या या कार्यासाठी अशोक गिरी पोलीस निरिक्षक सिटि चौक, दु.पोनि अशोक भंडारे पोलीस उपनिरिक्षक मुजगुले,मुळे ठाणे अंमलदार खंडेश पाटील,पोलिस अंमलदार धोत्रे,समाजसेवक सुमित पंडित, कचरु सुरडकर,देविदास पंडित,समाजसेविका पुजा पंडित,आदिनीं सहकार्य केले.
-------------------------------------------
प्रतिक्रिया
त्यांना' दुःख देण्याचा आमचा काय अधिकार
ज्या आई-वडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले स्वतःचे दुःख सहन करून आम्हाला सुखाची सावली दिली. असे असताना जेव्हा आई-वडिलांना एक टे सोडून देणे ही माणुसकी नाही ही समाजातील कोणत्याही आई-वडिलांना त्रास न देता त्यांची सेवा केली पाहिजे.ज्यांच्या मुळे आम्ही जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा आमचा कोणताही अधिकार नाही.
अशोक गिरी पोलीस निरिक्षक सिटी चौक पोलीस ठाणे औरंगाबाद शहर.