Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १०, २०२१

कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी दिला मदतीचा हात



वरोरा तालुक्यातील १७ विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्यातून मिळवून दिली मदत 

शिरीष उगे/ वरोरा 

आमदार प्रतिभाताई धानोरकर मतदार संघातील प्रत्येक महिलांच्या संकटात नेहमी धावून जातात. कोरोना काळात देखील मतदार संघातील मृत्य व्यक्तीच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्या स्वतः त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष त्या कुटुंबातील महिला सोबत संवाद साधला. त्यावेळी संबंधित कुटुंबाला योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याकरिता तहसीलदार यांना  सूचना केल्या.  त्यानुसार वरोरा तालुक्यातील १७ कुटुंबातील महिलांना धनादेश आमदार प्रतिंभाताई धानोरकरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. 


                      यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार बेडसे, बाजार समिती सभापती राजू चिकटे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष मिलिंद भोयर,  संजय गांधी निराधार समिती सदस्य विशाल बदखल, संजय गांधी निराधार समिती सदस्य  यशोदा खामणकर,  संजय गांधी निराधार समिती सदस्य गायकवाड, संजय गांधी निराधार समिती सदस्य  दिवाकर निखाडे,  संजय गांधी निराधार समिती सदस्य अविनाश ढेंगळे यांची उपस्थिती होती. 

    

               राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य पात्र यादीत सरस्वती सोयाम, रुपाली ठावरी, सोनू देवगडे, मनीषा पिपळकर, प्रेमीला पंधरे, माधुरी बीरिया, वर्षा डाफ, सरिता ठावरी, रेखा देवाळकर, माधुरी बागेसर, नंदा बुरडकर, रत्नमाला नगराळे, देवकी कोटांगले, उषा वानखेडे, छाया कोल्हेकर, मंगला कहूरके, कल्पना लेडांगें यांच्या समावेश होता.  


                             पुढे देखील महिलांच्या प्रश्नासाठी नेहमी पुढे येऊन लढेल, तसेच त्यांच्या साठी विविध योजनेच्या माध्यमांतून वेळोवेळी मदत मिळवून देईल त्यांच्या सर्वागीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.