Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

खुलताबाद तालुका वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त सर्कल पदाधिकारी यांचा सत्कार.

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट मा.खा.ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम योगेश बन, यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात आज दि.१८ ऑगस्ट २०२१ रोजी( शंजरी हॉटेल) येथे खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल वेरूळ, गदाना, बाजार सावंगी, पक्ष संघटना वाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्या अंतर्गत खुलताबाद तालुक्यामधील नवनियुक्त सर्कल पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेजवळ,  महासचिव पंकज बनसोडे, संघटक बाबा पाटेल, सचिव अशोक खिल्लारे, संघटक कोतकर सर, सचिव धनेधर साहेब, मीडिया प्रमुख बाबासाहेब वक्ते,ता. महासचिव राजाराम घुसळे, वीरेंद्र वाघ, किशोर धनेधर, योगेश साबळे, कैलास गिरी, मंदा सादिवे, सोनाली राजपूत, व पुढील प्रमाणे कार्यकारिण्या जाहीर,( वेरूळ सर्कल) सुभाष शेकू शिंदे अध्यक्ष, रविशंकर फुलारे उपाध्यक्ष, गजानन प्रभाकर भालेराव उपाध्यक्ष, महेंद्र मुरलीधर मगरे महासचिव, जुबेर शेख नूरुद्दीन महासचिव, सुरेश रघुनाथ नवगरे संघटक, राजेंद्र जितू भोसले सहसंघटक, अशोक नारायण आव्हाड सचिव, कुंदन आवळी पवार सहसचिव, आजिनाथ दशरत आव्हाड सल्लागार, संतोष भरत काजी स.सल्लागार,
(गदाना सर्कल) बाळू विठ्ठल राव श्रीखंडे अध्यक्ष, जनार्दन यशवंत माळी उपाध्यक्ष, मनोज शेजवळ उपाध्यक्ष, मच्छिंद्र आसाराम उबाळे महासचिव, रोहिदास पांडुरंग जाधव महासचिव, अमोल गुलाबसिंग राठोड संघटक, संतोष भांडे सहसंघटक, रोहिदास रामभाऊ वाघचौरे सचिव, बाबासाहेब उत्तम पवार सहसचिव. (बाजार सांगली सर्कल) अरुण साहेबराव गायकवाड अध्यक्ष, विठ्ठल शंकर खरात उपाध्यक्ष, शेख शब्बीर शेख सांडू उपाध्यक्ष, पंढरीनाथ सांडू शिंदे महासचिव, गणेश रावसाहेब जाधव महासचिव, बाबासाहेब नामदेव नरवडे संघटक, कलीम यासीन पठाण सहसंघटक, आजिनाथ भागाजी धनेधर सचिव, अर्जुन मनाजी गरुड सहसचिव. या सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले असून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवाल व आपल्याला नियुक्त केलेल्या पदाला पक्षहितासाठी व संघटना वाढीसाठी तन-मन-धनातून प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा करतो. वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणाचे व आदेशाचे काटेकोर पालन करावे ही अपेक्षा बाळगतो व सदरील कार्यकारणी विस्तार लवकरात लवकर ३१/५१ प्रमाणे तयार करावी व आपल्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्या भाषणातून संबोधित करण्यात आले व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार करतांना पदाधिकारी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.