Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १०, २०२१

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन | Ayurvedacharya and writer Balaji Tambe



आयुर्वेदाचार्य डाॅ. बालाजी तांबे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात आज (मंगळवारी) निधन झाले. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या आठवड्यात डाॅ. तांबे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 डाॅ. तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार विषयांतील तज्ज्ञ होते. लोणावळ्याजवळील कार्ला येथील 'आत्मसंतुलन व्हिलेज'चे ते संस्थापक होते. आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवर त्यांनी विपूल संशोधन केले. त्यांचे ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकाचे इंग्रजीसह सहा भाषांमध्ये भाषांतर झाले.

विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून योग आणि आयुर्वेद या विषयावर प्रबोधन केलं. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्याचे मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं.

आयुर्वेदयोग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली

 

          मुंबईदि. 10 : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोकसंदेशात म्हणतातआयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देशविदेशातही प्रसार केला. आहारविहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहेहा संदेश त्यांनी सहजसोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख


            
मुंबई, दि. 10 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी आरोग्यविषयक लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमतभगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

Governor Koshyari condoles the demise of Ayurvedacharya Balaji Tambe

            Mumbai, 10th August : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed grief over the demise of Ayurvedacharya and writer Balaji Tambe. In a condolence message, the Governor wrote:

             “Saddened to know about the demise of Ayurvedacharya Shri Balaji Tambe. He dedicated his entire life to promote and popularise Ayurveda and Yoga. Through his lucid writings and talks he showed the path of an exalted and healthy life to the people of all ages till his last. Like Yoga and Ayurveda, he also strived to spread the knowledge of Bhagwad Gita to the masses. May God grant peace to the departed soul and give strength to the members of the bereaved family to bear the loss.”



अध्यात्मिकसांस्कृतिकसाहित्यिकवैद्यकीय क्षेत्रातले

ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपले : उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना उपमुख्यमंत्र्यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 10 :- आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांनी अध्यात्मआयुर्वेदयोगोपचारसंगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनरुज्जीवन केले. आयुर्वेदयोगोपचारांना राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय किर्तीलोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्वं घराघरात पोहचवले. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगीसुदृढआनंदी समाज निर्माण करण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या अध्यात्मिकसांस्कृतिकसाहित्यिकवैद्यकीय क्षेत्रातले ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

             आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीभारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. आयुर्वेदाचे महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाहिनीवरुन संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचे ज्ञान देशविदेशात पोहचवले. सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचे फार मोठे काम त्यांनी केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञानमहत्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्री. बालाजी तांबे यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.