नागपूर जिल्हा परिषदेत निविदा घोटाळा
मुखमंत्र्यांकडे कारेमोरे यांची तक्रार
Tender scam in Zilla Parishad. Complaint to the Chief Minister
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी रस्ते ई-निविदा प्रक्रियेत घोळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेत कमी दरात ई-निविदेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदरांना डावलण्यात आले आहे. तर, अधिक दराने या प्रक्रियेत सहभागी झालेल्यांना कामे देण्यात आलेली आहेत. गुप्ता यांनी मर्जीतील कंत्राटदारांना जिल्ह्यातील रस्त्यांची कामे दिलेली आहेत. त्यामुळे अनेक कंत्राटदार कोरोना काळात चिंतेत आहेत. अनेकांनाही निविदा प्रक्रियेत पैसे जमा केले. मात्र, त्यांच्या हाताला काम न मिळाल्यामुळे गुप्ता यांच्याविरोधात रोष दिसत आहे. यात मोठा घोळ झाला असून गुप्ता यांनी पदाचा दुरुपयोग करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कारेमोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
........
सीईओंनी द्यावे लक्ष
नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता होण्यापूर्वी गुप्ता उमरेडला उपअभियंता होते. तेथील कामातही गुप्ता यांनी अनियमितता केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कारेमोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.